सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण विकलांगता संस्थेने (दिव्यांगजन) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या सहकार्याने "ऑडिओलॉजिकल असेसमेंट प्रोटोकॉलमधील अलिकडच्या काळातील प्रगती" या विषयावर पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे केले आयोजन

Posted On: 04 AUG 2025 3:14PM by PIB Mumbai

मुंबई, 4 ऑगस्ट 2025

अली यावर जंग राष्ट्रीय वाणी आणि श्रवण विकलांगता संस्थेने (दिव्यांगजन) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबईच्या सहकार्याने "ऑडिओलॉजिकल असेसमेंट प्रोटोकॉलमधील अलिकडच्या काळातील प्रगती" या विषयावर पहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन केले. या परिषदेला रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडियाने सातत्यपूर्ण  पुनर्वसन शिक्षण (कंटिन्युइंग रिहॅबिलिटेशन एज्युकेशन)  दर्जासह  मान्यता दिली. ही परिषद 2 आणि 3 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईतील टीआयएसएस मुख्य संकुलातील प्रा. एस. परशुरामन कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आली होती.

 

उद्घाटन कार्यक्रमाला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) चे रजिस्ट्रार नरेंद्र मिश्रा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सत्राला डॉ. सुमन कुमार, संचालक, AYJNISHD (D), मुंबई, डॉ. वैशाली कोल्हे, सहाय्यक  प्राध्यापक, TISS, डॉ. शिवराज भीमटे, ऑडिओलॉजी रीडर , AYJNISHD (D); आणि डॉ. नीलेश वाष्निक, सहाय्यक  प्राध्यापक, ओहिओ  विद्यापीठ आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमानंतर, डॉ. मुथुकृष्णन नचियाप्पन यांनी "श्रवणशास्त्रातील नीतिमूल्ये" या विषयावर व्याख्यान दिले, यात त्यांनी  श्रवणशास्त्र पद्धतींमधील नैतिक विचार आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांबद्दल मार्गदर्शन केले.  डॉ. सुमन कुमार यांनी AYJNISHD(D), मुंबई चा दृष्टिकोन, ध्येय आणि प्रमुख उपक्रमांचा थोडक्यात आढावा सादर केला. त्यानंतर डॉ. वैशाली कोल्हे यांनी सादरीकरण केले, ज्यात त्यांनी  टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) ची ओळख करून दिली आणि दिव्यांगत्व अभ्यास आणि सामाजिक कार्यामधील त्यांचे उल्लेखनीय  योगदान अधोरेखित केले. या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. आर. रंगासयी, माजी संचालक,  AYJNISHD(D),  मुंबई यांनी केले.

डॉ. नीलेश वाशनिक यांनी "डिमिस्टिफायिंग हिडन हिअरिंग लॉस: एटिओलॉजीज, करंट नॉलेज अँड फ्युचर डायरेक्शन्स" आणि "ऑडिशन अँड कॉग्निशन: एक्सप्लोरिंग कॉग्निटिव्ह स्क्रीनिंग टूल्स फॉर ऑडिओलॉजिस्ट" या शीर्षकाअंतर्गत दोन अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. ड्रेक्सेल युनिव्हर्सिटीच्या डॉ. राधिका अरवमुधन यांनी "ऑडिटरी प्रोसेसिंग डिसऑर्डर्स: इंटरप्रोफेशनल अ‍ॅप्रोच टू डायग्नोसिस अँड मॅनेजमेंट" या विषयावरील आपल्या कामाचे सादरीकरण  केले. आयोवा युनिव्हर्सिटीचे डॉ. इशान भट यांनी "अ फेनोम-वाइड कोमोर्बिडिटी ॲटलस ऑफ एज-रिलेटेड हिअरिंग लॉस, स्पीच-इन-नॉईज डेफिसिट्स अँड टिनिटस: डिस्टिंग्विशिंग कॉजल सिग्नल्स फ्रॉम कोरिलेशन" या विषयावर आपले विचार मांडले.

ऑस्ट्रियातील MED-EL मधील इलेक्ट्रोअ‍ॅकॉस्टिक स्टिम्युलेशन सायंटिस्ट प्रेम रंजन यांनी "हिअरिंग प्रिझर्वेशन  कॉक्लियर इम्प्लांट सर्जरीमध्ये ऑडिओलॉजिस्टची भूमिका" या विषयावर मार्गदर्शन केले.  कॅलिफोर्नियातील संशोधन वैज्ञानिक आणि श्रवण आरोग्यसेवा तज्ञ डॉ. स्मिता अग्रवाल यांचे "कॉक्लियर इम्प्लांट व्यवस्थापनात वस्तुनिष्ठ उपाययोजनांचा वापर" या विषयावर व्याख्यान झाले. गॅलॉडेट विद्यापीठातील डॉ. संयुक्ता जयस्वाल यांनी "ऑडिटरी व्हर्बल थेरपी अँड बियॉन्ड : आयसीएफ युगातील श्रवण पुनर्वसन" या विषयावर आपले विचार मांडले तर डॉ. शिवराज भिमटे यांनी "श्रवणविषयक मूल्यांकन पद्धतींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे एकात्मिकरण" या विषयावर सादरीकरण केले.

समृद्ध करणाऱ्या या सत्रांचे नेतृत्व  डॉ. स्मिता अग्रवाल, डॉ. नीलेश वाशनिक आणि डॉ. सुमन कुमार यांनी केले. या परिषदेत देशातील विविध राज्यांमधून तसेच परदेशातून 100 हून अधिक जण उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतातील अंदाजे 63 दशलक्ष  व्यक्तींना श्रवणदोषाची प्रमुख समस्या  असून  सुमारे 7% लोकसंख्येला कोणत्या ना कोणत्या प्रकारचा  श्रवणदोष आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, जन्मानंतर अवघ्या 48 तासांमध्येच  श्रवणदोषाचे निदान करता येते. जागतिक स्तरावर शिफारस करण्यात आलेला "1-2-3 दृष्टिकोन" 1  महिन्याच्या आत  तपासणी, 2 महिन्यांच्या आत  निदान आणि 3 महिने झाल्यावर उपचार सुरू करण्याचे समर्थन करतो.

भारत या आंतरराष्ट्रीय निकषांशी एकरूप राहण्याचा प्रयत्न करत असला तरी सार्वत्रिक नवजात बालकांच्या श्रवण तपासणीची अंमलबजावणी ही एक तातडीची गरज बनली आहे. जागतिक स्तरावर, वाढते ध्वनी प्रदूषण, जीवनशैलीशी संबंधित श्रवण विषयक ताण आणि वृद्धांच्या लोकसंख्येमुळे श्रवण विकार वाढत आहेत. विशेषतः मुलांसाठी वेळेत निदान होणे  अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण लवकर सुरु केलेले उपचार वाणी आणि भाषा विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र  श्रवणशक्ती कमी झाली आहे हे अनेकदा वर्षानुवर्षे लक्षात येत नाही, परिणामी  सामाजिक अंतर राखणे, शैक्षणिक अडचणी आणि जीवनाचा दर्जा खालावतो.  या पार्श्वभूमीवर, परिषदेने ऑडिओलॉजी क्षेत्रात अलिकडच्या काळातील प्रगती आणि सर्वोत्तम पद्धतींवर चर्चा करण्यासाठी जगभरातील आघाडीच्या तज्ञांना एकत्र आणले.

सोनल तुपे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2152097)
Read this release in: English