कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीबीआयने सहार एअर कार्गो, मुंबई येथील सीमाशुल्क अधीक्षकाला 10.20 लाख रुपयांची लाच घेताना अटक केली

Posted On: 03 AUG 2025 7:12PM by PIB Mumbai

 

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) ने सहार एअर कार्गो कॉम्प्लेक्स, मुंबई येथे नियुक्त असलेल्या सीमाशुल्क अधीक्षकास 10,20,000 रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. ही रक्कम एका कस्टम्स हाउस एजंट (सीएचए) संस्थेकडून आयात मालाच्या मंजुरीस मदत करण्यासाठी मागितल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात सीबीआयने आरोपी व इतर अज्ञात सार्वजनिक अधिकारी तसेच खाजगी व्यक्तींविरुद्ध तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला. तक्रारीनुसार, आयात माल वेळेवर व अडथळ्यांशिवाय मंजूर करण्यासाठी  आरोपीने फक्त स्वतःसाठीच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी देखील 10 रुपये प्रति किलो दराने लाच मागितली होती.

तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिल्यानंतरही आरोपीने दबाव आणत धमकी दिल्याचेही आरोप आहेत. लाच न दिल्याने  हेतुपुरस्सर  माल रोखून ठेवल्याचाही आरोप आहे. 

या आरोपांची जुलै 25 ते ऑगस्ट 1, 2025 दरम्यान, स्वतंत्र साक्षीदारांच्या  उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान रेकॉर्डेड संभाषणे आणि अन्य भौतिक पुरावे लाच मागणीला दुजोरा देणारे ठरले. आरोपीने पुढीलप्रमाणे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले:

6,00,000 रुपये– पूर्वी मंजूर केलेल्या मालासाठी (5,80,000 रुपये वरिष्ठांसाठी; 20,000 रुपये स्वतःसाठी)

10,00,000 रुपये – सध्या थांबवण्यात आलेल्या मालाच्या सोडवणुकीसाठी

तसेच भविष्यातील प्रत्येक मालासाठी 10 रुपये प्रति किलो दराने लाच

पडताळणीनंतर सीबीआयने 2 ऑगस्ट 2025 रोजी सापळा रचून आरोपीस 10,20,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

आरोपीस संबंधित न्यायालयात हजर करण्यात आले असून, 6 ऑगस्ट 2025 पर्यंत पोलिस कोठडी (पीसीआर) सुनावण्यात आली आहे.

पुढील तपास सुरू आहे.

***

निलिमा चितळे/गजेंद्र देवडा/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2151994) Visitor Counter : 3
Read this release in: English