गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुसापती अशोक गजपती राजू यांनी गोव्याच्या राज्यपालपदाची घेतली शपथ

प्रविष्टि तिथि: 26 JUL 2025 4:30PM by PIB Mumbai

 

पुसापती अशोक गजपती राजू यांनी आज गोव्यात डोना पॉला येथील राजभवनात नवीन दरबार सभागृहात झालेल्या शपथविधी समारंभानंतर गोव्याचे 22 वे राज्यपाल म्हणून कार्यभार स्वीकारला. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली.

या शपथविधीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्रीपरिषद, खासदार, आमदार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आंध्र प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष चिंताकायला अय्यन्नपात्रडू, आंध्र प्रदेशच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री गुम्मीदी संध्या राणी, राज्यसभा सदस्य सदानंद तानावडे, इतर राजकीय नेते आणि सन्माननीय नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जारी केलेल्या राज्यपालांच्या नियुक्तीपत्राचे वाचन मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदवेलू यांनी केले.

अशोक गजपती राजू यांनी त्यांच्या चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत आणि सामाजिक सेवेत अभूतपूर्व कामगिरी केली आहे. 2014 साली त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री म्हणून काम केले आहे. यापूर्वी 1978 मध्ये ते आंध्र प्रदेशातील विझीनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली. याशिवाय, ते आंध्र प्रदेशातील प्रमुख ट्रस्ट मानस (महाराजा अलक नारायण सोसायटी ऑफ आर्ट्स अँड सायन्स) चे नेतृत्व करत आहेत. शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने त्यांच्या वडिलांनी 1958 मध्ये या ट्रस्टची स्थापना केली होती.

पुसापती अशोक गजपती राजू यांनी पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्यानंतर गोव्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

***

माधुरी पांगे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2148862) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English