अणुऊर्जा विभाग
पॅरिस येथे झालेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड 2025 मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी केली उज्ज्वल कामगिरी
Posted On:
25 JUL 2025 6:01PM by PIB Mumbai
18 जुलै ते 24 जुलै 2025 दरम्यान फ्रान्समधील पॅरिस येथे झालेल्या 55 व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड (IPhO) 2025 मध्ये भारतीय चमूने उल्लेखनीय यश मिळवले आहे. सर्व पाच भारतीय विद्यार्थ्यांनी पदके पटकावली असून यामध्ये 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांचा समावेश आहे.
पदक विजेते आहेत:
- कनिष्क जैन (सुवर्ण पदक) पुणे, महाराष्ट्र
- स्नेहिल झा (सुवर्ण पदक) जबलपूर, मध्य प्रदेश
- रिद्धेश अनंत बेंडाळे (सुवर्ण पदक) इंदूर, मध्य प्रदेश
- आगम जिग्नेश शाह (सुवर्ण पदक) सुरत, गुजरात
- रजित गुप्ता (सुवर्ण पदक) कोटा, राजस्थान
भारतीय पथकाचे प्राध्यापक सितिकंठ दास (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर) विनायक काटदरे (डी. जी. रूपारेल कॉलेज, मुंबई येथील निवृत्त) या दोघांनी नेतृत्व केले, तर डॉ. अमृता साधू (सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई) आणि डॉ. विवेक लोहानी (रॉबर्ट बॉश जीएमबीएच, जर्मनी) हे या पथकाचे वैज्ञानिक निरीक्षक होते.
देशनिहाय पदकतालिकेत, भारताने तैवान, जपान आणि रशिया (ऑलिंपियाडच्या ध्वजाखाली सहभागी) यांच्यासह संयुक्तपणे पाचव्या स्थान पटकावले. अमेरिका 5 सुवर्ण पदकांसह अव्वल स्थानावर आहे. दक्षिण कोरिया, चीन आणि हाँगकाँग यांनी प्रत्येकी 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदकांसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले. एकूण 87 देशांतील एकूण 415 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. याशिवाय पाच देश निरीक्षक म्हणून या स्पर्धेत सहभागी झाले होते, ज्यामुळे ही आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड इतिहासातील एक सर्वाधिक सहभाग असलेली स्पर्धा ठरली.
आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड भारताचा हा 26 वा सहभाग होता. या कालावधीत सुमारे, 42% भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके, 42% रौप्य, 11% कांस्य आणि 5% सन्माननीय उल्लेख मिळवले आहेत. गेल्या दहा वर्षांत, आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी केवळ सुवर्ण (58%) किंवा रौप्य (42%) पदकांची कमाई केली आहे.
हे यश होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रातील (HBCSE) अभिमुखता आणि प्री-डिपार्चर शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या भौतिकशास्त्र ऑलिंपियाड सेल, बाह्य शिक्षक आणि मार्गदर्शकांच्या अथक प्रयत्नांचे फलित आहे. विज्ञान ऑलिंपियाडवरील राष्ट्रीय सुकाणू समिती, शिक्षक संघटना आणि भारत सरकारच्या निधी संस्थांनी ऑलिंपियाड कार्यक्रमाला भक्कम पाठिंबा देऊन महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, ज्यामुळे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राला (HBCSE) हे यश मिळवणे शक्य झाले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय प्रतिभा प्रदर्शित करता आली.
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (HBCSE) हे गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्रातील विविध आंतरराष्ट्रीय ऑलिंपियाडमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे आणि निवड करणारे नोडल केंद्र आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राद्वारे (HBCSE) आयोजित राष्ट्रीय ऑलिंपियाड परीक्षेच्या माध्यमातून अंतिम पथकाची निवड केली जाते.
अधिक माहिती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे:
- https://www.ipho2024.ir/
- https://www.ipho-new.org/
- https://olympiads.hbcse.tifr.res.in/

55 वा आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिंपियाड 2025 मध्ये सहभागी भारतीय चमू
डावीकडून उजवीकडे चित्रात: विनायक काटदरे (नेता), स्नेहिल झा (सुवर्ण पदक), रजित गुप्ता (रजत पदक), रिद्धेश अनंत बेंडाळे (सुवर्ण पदक), कनिष्क जैन (सुवर्ण पदक), आगम शाह (रजत पदक), डॉ. अमृता साधू (निरीक्षक), डॉ. सितिकंठ दास (नेता)
***
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2148705)
Visitor Counter : 11