पर्यटन मंत्रालय
जागतिक स्तरावर प्रतिष्ठित पर्यटन स्थळे विकसित करण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने ‘एस ए एस सी आय’ योजनेसाठी मार्गदर्शक सूचना केल्या जारी
प्रविष्टि तिथि:
21 JUL 2025 9:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 21 जुलै 2025
जागतिक स्तरावर प्रतिष्ठित पर्यटन स्थळांचा विकास (एस ए एस सी आय) या योजनेअंतर्गत भारत सरकारने देशभरात 3295.76 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 40 प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नाशिक येथील 99.14 कोटी रुपये गुंतवणुकीच्या ‘राम-काल पथ विकास’ या प्रकल्पाचा समावेश आहे.
वर्ष 2024 25 मध्ये पर्यटन मंत्रालयाने, राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य - जागतिक स्तरावर प्रतिष्ठित पर्यटन स्थळांचा विकास (एस ए एस सी आय) या योजनेसाठी कार्यकारी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. देशातील प्रतिष्ठित पर्यटन स्थळांचा व्यापक विकास करणे, तसेच जागतिक स्तरावर ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्पांची निवड संबंधित राज्य सरकारांनी सादर केलेल्या प्रकल्प प्रस्तावांवर आधारित असून त्यांचे मूल्यांकन ठरवलेल्या निकषानुसार तसेच योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या संस्थात्मक चौकटीच्या आधारे करण्यात आले आहे.
योजनेच्या आकृतिबंधानुसार, संबंधित राज्य सरकारने तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करणे आवश्यक आहे. हा अहवाल व्यवस्थापन आणि कामकाजाचे नियोजन यासह सर्व संबंधित घटकांचे विश्लेषण केल्यानंतर तयार करावा. याशिवाय राज्यांनी ‘डीपीआर’ तयार करताना प्रकल्पाशी संबंधित विविध घटकांशी आणि स्थानिक समाज प्रतिनिधींशी विचारविनिमय करावा. एसएएससीआय योजनेच्या संदर्भात जारी केलेल्या मंजुरी आदेशानुसार मान्यता मिळालेले प्रकल्प जास्तीत जास्त 2 वर्षांमध्ये विकसित आणि पूर्ण केले जावेत. केंद्र सरकार या योजनेअंतर्गत 31 मार्च 2026 पर्यंत निधी वितरित करेल.
प्रामुख्याने पर्यटन स्थळांचा विकास आणि प्रचार तसेच त्याचे क्षमता मूल्यांकन संबंधित राज्य सरकार अथवा केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासनाने सुरू केले आहे. पर्यटन मंत्रालयदेखील विविध योजनांच्या माध्यमातून पर्यटन सुविधा विकासासाठी राज्यांना, केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक सहाय्य करत आहे. स्वदेश दर्शन (एसडी), स्वदेश दर्शन 2.0 (एसडी 2.0), आव्हान आधारित स्थळ विकास (सीबीडीडी) ही स्वदेश दर्शन 2.0 योजनेची उपयोजना आणि यात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक, वारसा संवर्धन मोहीम (प्रशाद) या पर्यटन मंत्रालयाच्या योजनांचा यामध्ये समावेश आहे.
(I) महाराष्ट्रात स्वदेश दर्शन योजनेंतर्गत निश्चित संकल्पनीय परिमंडळांच्या अंतर्गत मंजूर प्रकल्पांचे तपशील
|
अनुक्रमांक S.
No.
|
राज्ये/केंद्रशासित प्रदेश
|
परिमंडळे / मंजुरी वर्ष
|
प्रकल्पाचे नाव
|
मजूर खर्च
(कोटी रुपयांमध्ये)
|
|
1.
|
महाराष्ट्र
|
तटवर्ती परिमंडळ / 2015-16
|
सिंधुदुर्ग तटवर्ती परिमंडळ विकास- सागरेश्वर, तारकर्ली, विजयदुर्ग (किनारा आणि खाडी), मिठबाव
|
19.06
|
|
2.
|
महाराष्ट्र
|
अध्यात्मिक परिमंडळ
2018-19
|
वाकी-आडसा-धोपेश्वर-परडसिंघा-तेलंकखंडी-गिरड
|
45.47
|
(II) महाराष्ट्रात प्रशाद योजनेंतर्गत मंजूर झालेल्या प्रकल्पांची यादी:-
|
अनुक्रमांक
|
राज्य/केंद्रशासित प्रदेश
|
प्रकल्पाचे नाव
|
मंजुरी वर्ष
|
मंजूर खर्च
(कोटी रुपयांमध्ये)
|
|
1.
|
महाराष्ट्र
|
नाशिक मधील त्र्यंबकेश्वरचा विकास,
|
2017-18
|
45.41
|
(iii) महाराष्ट्रात स्वदेश दर्शन 2.0 अंतर्गत मंजूर झालेल्या प्रकल्पांची यादी
(रक्कम कोटी रुपयांमध्ये)
|
अनुक्रमांक
|
राज्य/केंद्रशासित प्रदेश
|
प्रकल्पाचे नाव
|
मंजुरी वर्ष
|
मंजूर खर्च
(कोटी रुपयांमध्ये)
|
|
1.
|
महाराष्ट्र
|
शिवसृष्टी ऐतिहासिक थीम पार्क – टप्पा 3
|
2023-24
|
76.22
|
(iv) महाराष्ट्रात सीबीडीडीच्या एसडी 2.0 या उपयोजनेअंतर्गत मजूर झालेल्या प्रकल्पांची यादी (रक्कम कोटी रुपयांमध्ये)
|
अनुक्रमांक
|
राज्य/केंद्रशासित प्रदेश
|
मंजुरी वर्ष
|
प्रकल्पाचे नाव
|
मंजूर खर्च
(कोटी रुपयांमध्ये)
|
|
1.
|
महाराष्ट्र
|
2024-25
|
अहमदनगर किल्ल्याचा विकास
|
24.99
|
ही माहिती केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
सुवर्णा बेडेकर/श्रद्धा मुखेडकर/सुरेखा जोशी/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2146635)
आगंतुक पटल : 25
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English