माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव एनएफडीसी - नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा येथे 'भारत पॅव्हेलियन'चे करणार उद्घाटन


कथाकथनाची संस्कृती म्हणून भारताच्या उत्क्रांतीचा मागोवा घेण्याबरोबरच 'भारत पॅव्हेलियन' जागतिक सर्जनशील समुदायासाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार

Posted On: 17 JUL 2025 8:36PM by PIB Mumbai

मुंबई, 17 जुलै 2025

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव येत्या 18 जुलै 2025 (शुक्रवार) रोजी मुंबईतील एनएफडीसी कॉम्प्लेक्समधील नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (NMIC) येथील गुलशन महलमध्ये भारत पॅव्हेलियनचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव राजेश कुमार मीणा आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू  हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने याची संकल्पना केली असून स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेले हे भारत पॅव्हेलियन देशाला जागतिक स्तरावर एक सर्जनशील महासत्ता बनवण्याची आकांक्षा दर्शवत आहे. हे केवळ एक प्रदर्शन नसून, माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या आशय, सर्जनशीलता आणि संस्कृतीचे बळ असलेली ऑरेंज इकॉनॉमी  जोपासण्याची वचनबद्धता दर्शवणारा एक सखोल अनुभव आहे.

भारत पॅव्हेलियन: माहिती व प्रसारण मंत्रालयाचा एक ऐतिहासिक उपक्रम

भारताच्या कालातीत कथाकथनाच्या वारशाचा आणि जागतिक सामग्री निर्मिती भविष्यातील त्याच्या गतिमान भरारीचा उत्सव साजरा करत, मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025 चा भारत पॅव्हेलियन हा केंद्रबिंदू ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या पॅव्हेलियनने भारताचा  सांस्कृतिक गाभा  आणि 'कलेपासून कोड'पर्यंतच्या डिजिटल परिवर्तनाला अभिवादन केले आहे.

पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीनुसार या पॅव्हेलियनची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाप्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले होते, "भारताच्या  ऑरेंज इकॉनॉमीची ही पहाट आहे आणि भारताच्या कथांमध्ये जगाला जोडण्याची ताकद आहे." हा उपक्रम मंत्रालयाच्या भारताला माध्यम, मनोरंजन आणि कथाकथन नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनवण्याच्या व्यापक ध्येयाशी सुसंगत आहे.

भारत पॅव्हेलियन विविध संकल्पनावार विभागांमध्ये विभागलेले आहे, जे भारताच्या कथाकथनाच्या संस्कृतीतील स्थित्यंतर दर्शवते.

  • श्रुती – मौखिक परंपरा: वैदिक मंत्र आणि लोककथांपासून ते आधुनिक पॉडकास्ट आणि संगीत स्ट्रीमिंगपर्यंत, हा विभाग भारताच्या ध्वनी वारशाचा गौरव करतो.
  • कृती – लिखित वारसा: प्राचीन हस्तलिखितांपासून ते पत्रकारिता आणि प्रकाशनाच्या डिजिटल युगापर्यंत, लिखित शब्दाची शक्ती दर्शवतो.
  • दृष्टी – दृश्य कथाकथन: नाट्यशास्त्रापासून ते बॉलिवूड आणि ओटीटी प्लॅटफॉर्मपर्यंत, भारताच्या कला आणि सिनेमाच्या प्रभावाचा वेध घेतो.

थीमॅटिक झोन (संकल्पनेवर आधारित विभाग) ची ही रचना भारताचा कथाकथनाचा पट उलगडते, जिथे प्राचीन ज्ञान  आणि आधुनिक नवोन्मेष एकत्र येतात.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) पॅव्हेलियनमधील सामग्री आणि पोहोच याचे संकलन आणि व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावली. वेव्हज (WAVES) 2025 चे सह-यजमान असलेल्या महाराष्ट्र सरकारने उच्चस्तरीय भागीदारी आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करून सर्जनशील उद्योगांमध्ये आपले नेतृत्व अधोरेखित केले, ज्यामुळे भारताची सांस्कृतिक आणि सिनेमॅटिक राजधानी म्हणून महाराष्ट्राचे स्थान बळकट झाले.

जागतिक स्तरावरील मान्यवर, कलाकार, स्टुडिओ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांसाठी हे पॅव्हेलियन आकर्षणाचे केंद्र ठरले. मेटा, अमेझॉन, गुगल, अ‍ॅडोब, ड्रीम फाउंडेशन, जिओ, यासारख्या कंपन्या आणि 180 हून अधिक कंपन्यांनी सहयोगात्मक प्रदर्शनांमध्ये भाग घेतला, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय आशयसंपन्न सामग्रीच्या नकाशावर भारताचे स्थान मजबूत झाले. कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सपासून ते चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांपर्यंत, तळागाळातील निर्मात्यांपासून ते ग्लोबल टेक लीडर्स (तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक नेतृत्व) पर्यंत भारत पॅव्हेलियनने वैविध्यपूर्ण सर्जनशील विश्वांना एकमेकांशी जोडले. शिखर परिषदेदरम्यान, पॅव्हेलियनचे मुंबईतील राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयामध्ये (NMIC) स्थलांतर करण्याची ऐतिहासिक घोषणा करण्यात आली, ज्यामुळे भारताच्या माध्यम उत्क्रांतीचे कायमस्वरूपी, परस्परसंवादी प्रदर्शनस्थळ निर्माण होत आहे.

भारत ‘क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर द वर्ल्ड’, म्हणजेच ‘भारतात निर्माण करा, जगासाठी निर्माण करा’ या तत्वज्ञानाचा स्वीकार करत असताना, भारत पॅव्हेलियन, स्वदेशी आयपीचा विस्तार करणे, डिजिटल सामग्री निर्मितीचे लोकशाहीकरण करणे आणि वेव्हज बझार, वेव्हएक्स आणि क्रिएटोस्फीअर प्लॅटफॉर्मद्वारे हे सहकार्य आणखी पुढे नेईल.

निलीमा चितळे/शैलेश पाटील/‍राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2145650)
Read this release in: English