रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतील उत्कृष्टतेसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार 2025 मध्ये विविध पुरस्कारांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर कोकण रेल्वेच्या कामगिरीची दखल

प्रविष्टि तिथि: 15 JUL 2025 8:11PM by PIB Mumbai

मुंबई, 15 जुलै 2025

 

मुंबईत 10 जुलै 2025 रोजी सार्वजनिक क्षेत्र उपक्रमांतील उत्कृष्टतेसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार 2025 हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेडला विविध श्रेणींअंतर्गतच्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले.

या सोहळ्यात कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेडच्या कामगिरीची खालील श्रेणींअंतर्गत दखल घेत पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

  • संशोधन आणि नवोन्मेषाअंतर्गचा सर्वोत्कृष्ट सार्वजनिक उपक्रम (PSU)
  • वस्तू आणि सेवांच्या खरेदीतील सर्वोत्तम कामगिरी
  • प्रशिक्षण आणि विकासाअंतर्गतचा सर्वोत्कृष्ट सार्वजनिक उपक्रम (PSU)

कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेडला प्रदान करण्यात आलेल्या या महत्त्वाच्या पुरस्कारांसोबतच, कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांना देखील, त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वासाठी सीईओ ऑफ द इयर अर्थात वर्षातील सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेडला मिळालेल्या या पुरस्कारांमधून कोकण रेल्वे राबवत असलेल्या नवीन कल्पना, संपूर्ण कोकण रेल्वे व्यवस्थापनाचे सुरळीत कामकाज आणि कार्यान्वयन तसेच भविष्याच्या अनुषंगाने कौशल्य विकासासाठी कोकण रेल्वे करत असलेले सातत्यपूर्ण प्रयत्नही ठळकपणे अधोरेखित झाले आहेत.

कोकण रेल्वे ही कायमच नवोन्मेष आणि उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध असून, देशाच्या विकासात योगदान देत राहणार आहे. कोकण रेल्वे महामंडळ लिमिटेड गाठत असलेल्या प्रत्येक यशाच्या टप्प्यामधून, सचोटीने, कार्यक्षमतेने आणि दीर्घकालीन प्रगतीवर लक्ष केंद्रित करून सेवा देण्याची आपली वचनबद्धताच ठळकपणे पुन्हा अधोरेखित करत आहे.

 

* * *

(स्त्रोत : जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे महामंडळ लि.)

पीआयबी मुंबई | सोनाली काकडे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2145005) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English