सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जून 2025 साठी 2012=100 वर आधारभूत ग्रामीण, शहरी आणि एकत्रित ग्राहक किंमत निर्देशांक

Posted On: 14 JUL 2025 8:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जुलै 2025

 

I. प्रमुख ठळक बाबी:

1. एकूण महागाई: जून 2025 मध्ये अखिल भारतासाठी ग्राहक किंमत निर्देशांक CPI वर आधारित वार्षिक चलनफुगवट्याचा दर जून 2024 च्या तुलनेत 2.10% (तात्पुरता) आहे. मे 2025 च्या तुलनेत जून 2025 मध्ये एकूण महागाईत 72 बेसिस पॉइंट्सची घट झाली आहे. हा जानेवारी 2019 नंतर वर्षागणिक सर्वात कमी चलनफुगवटा दर आहे.

2. अन्न महागाई: जून 2025 मध्ये अन्नविषयक ग्राहक किंमत निर्देशांक (CFPI) वर आधारित महागाईतील वाढ जून 2024 च्या तुलनेत -1.06% (तात्पुरती) आहे. ग्रामीण भागासाठी ही -0.92% आणि शहरी भागासाठी -1.22% आहे. मागील 13 महिन्यांतील CPI (सामान्य) आणि CFPI यांतील अखिल भारतीय महागाई वाढ खाली दिली आहे. मे 2025 च्या तुलनेत जून 2025 मध्ये अन्न महागाईत 205 बेसिस पॉइंट्सची तीव्र घट नोंदवली गेली आहे. ही महागाई वाढ जानेवारी 2019 नंतरची सर्वात कमी आहे.

3. जून 2025 मधील प्रमुख  आणि अन्न महागाईतील लक्षणीय घट ही प्रामुख्याने  भाज्या, कडधान्ये आणि उत्पादने, मांस व मासे, धान्ये व उत्पादने, साखर व मिठाई, दूध व उत्पादने आणि मसाले यामधील किंमतीतील घसरणीमुळे झाली आहे.

4. ग्रामीण महागाई: जून 2025 मध्ये ग्रामीण भागात प्रमुख  आणि खाद्यान्न चलनफुगवट्यात  लक्षणीय घट दिसून आली. प्रमुख चलनफुगवटा दर  1.72% (तात्पुरता ) राहिला.  मे 2025 मध्ये तो 2.59% होता. ग्रामीण क्षेत्रात CFPI आधारित खाद्यान्न चलनफुगवट्याचा दर   -0.92% (तात्पुरती) होता ;तो  मे 2025 मध्ये 0.95% होता.

5. शहरी महागाई: शहरी भागात प्रमुख  महागाई मे 2025 मधील 3.12% वरून जून 2025 मध्ये 2.56% (तात्पुरती) पर्यंत घसरली आहे. अन्न महागाईतही 1.01% वरून -1.22% (तात्पुरती) अशी तीव्र घट झाली आहे.

6. गृह महागाई: जून 2025 साठी वर्षभरातील गृहनिर्माण महागाईचा दर 3.24% (तात्पुरता) आहे. मे 2025 मध्ये हा 3.16% होता. गृह निर्देशांक फक्त शहरी भागासाठी तयार केला जातो.

7. शिक्षण महागाई: जून 2025 साठी शिक्षणविषयक वर्षभरातील महागाई वाढीचा दर 4.37% (तात्पुरता) आहे. मे 2025 मध्ये हा दर 4.12% होता. ही ग्रामीण व शहरी भागांची एकत्रित शिक्षण महागाई वाढ आहे.

8. आरोग्य महागाई: जून 2025 साठी आरोग्यविषयक वार्षिक चलनफुगवट्याचा  दर 4.43% (तात्पुरता) आहे. मे 2025 मध्ये हा दर 4.34% होता. ही ग्रामीण व शहरी दोन्ही भागांसाठी एकत्रित आरोग्य महागाई वाढ आहे.

9. वाहतूक व दळणवळण: जून 2025 साठी वर्षभरातील दर 3.90% (तात्पुरता) आहे. मे 2025 मध्ये हा दर 3.85% होता. हा ग्रामीण व शहरी दोन्ही भागांसाठी एकत्रित दर आहे.

10. इंधन व प्रकाश: जून 2025 साठी वर्ष आधारे चलनफुगवट्याचा  दर 2.55% (तात्पुरता) आहे. मे 2025 मध्ये हा दर 2.84% होता. ही ग्रामीण व शहरी दोन्ही भागांसाठी एकत्रित दर आहे.

11. जून 2025 मध्ये सर्वाधिक वार्षिक महागाई वाढ असलेल्या पाच प्रमुख राज्यांचे तपशील खालील आलेखात दिले आहेत.

List of Annex

* * *

S.Kakade/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2144672)
Read this release in: English , Urdu , Hindi