वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
प्रक्रिया आणि ब्रँडिंगवर लक्ष केंद्रित केले तर देशाच्या कृषी निर्यातीत 4.5 लाख कोटी रूपयांवरून 20 लाख कोटी रूपयांपर्यंत वाढेल : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
जांभूळ, लिची, अननस यासारख्या नवीन कृषी निर्यातीसह भारताचा जागतिक स्तरावर ठसा – पीयूष गोयल
प्रविष्टि तिथि:
09 JUL 2025 10:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जुलै 2025
भारताची कृषी आणि मत्स्य निर्यात 4.5 लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे. ते आज नवी दिल्ली येथे आयसीसी: कृषी विक्रम संकल्पना परिषदेला संबोधित करत होते. देशाने अन्न प्रक्रिया मजबूत केली आणि ब्रँडिंग आणि पॅकेजिंगची गुणवत्ता सुधारली तर कृषी निर्यात 20 लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याची क्षमता असल्याचे ते यावेळी म्हणाले.
गोयल यांनी सांगितले की, भारताच्या कृषी निर्यातीचा विस्तार होत आहे, जसे की लिची, अननस, दुधी भोपळा आणि जांभूळ, जे पारंपारिकरित्या निर्यात न होणारे उत्पादन, आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचत आहे. त्यांनी नमूद केले की, अलिकडेच जांभूळ युकेला निर्यात करण्यात आले आणि पंजाबमधील लिची दोहा आणि दुबईला निर्यात करण्यात आली. त्यांनी पुढे सांगितले की, युएई, सौदी अरेबिया आणि इतर आखाती देशांसारख्या जागतिक बाजारपेठांमध्ये भारताचा ठसा सातत्याने उमटत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षात भरड धान्यांना जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला, ज्यामुळे भारताच्या पारंपरिक धान्यांकडे आणि त्यांच्या पौष्टिक मूल्याकडे जगाचे लक्ष वेधले गेले.
नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीमध्ये अफाट क्षमता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विश्वास आणि ट्रेसेबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी सरकार ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या मदतीने सेंद्रिय उत्पादनांसाठी प्रमाणीकरणाचे निकष कठोर करत आहे. ते पुढे म्हणाले की, सरकार चांगले पॅकेजिंग आणि उत्पादनाच्या डिझाइनला सहाय्य करेल, जेणेकरून भारताच्या कृषी मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक अस्तित्व आणि स्पर्धात्मकता मिळेल.
पारदर्शक दर निश्चित करता यावेत ,यासाठी 1,400 मंडईंना मजबूत करण्यात आले असून, त्यांना ई-नाम व्यासपीठाशी जोडण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, यांत्रिकीकरणाच्या सहज उपलब्धतेसाठी शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक संघटनांचे पाठबळ मिळत आहे आणि 1 लाख कोटी रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा निधी कृषी-पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सहाय्य करत आहे.
आपल्या भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले की, सामूहिक प्रयत्न आणि नवोन्मेशी दृष्टिकोनाचा अवलंब करून, भारतीय शेती स्थानिक उत्पादनांना जागतिक यशोगाथांमध्ये रूपांतरित करू शकते आणि राष्ट्रीय विकासाचे खरे इंजिन म्हणून उदयाला येऊ शकते.
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2143590)
आगंतुक पटल : 17