अर्थ मंत्रालय
मुंबई सीमाशुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर परदेशी वन्यजीव तस्करीचा प्रयत्न रोखला
प्रविष्टि तिथि:
28 JUN 2025 9:50PM by PIB Mumbai
मुंबई सीमाशुल्क झोन-III ने एका भारतीय नागरिकाला परदेशी वन्यजीव प्रजातींची भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न करत असताना अटक केली आहे. हा प्रवासी 27 जून 2025 रोजी बँकॉकहून फ्लाइट क्रमांक 6E1052 ने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (CSMI) विमानतळावर पोहोचला होता. संशयाच्या आधारावर, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी पुढील तपासणीसाठी या व्यक्तीला अडवले.
चौकशीदरम्यान, प्रवासी अस्वस्थ असल्याचे दिसून आले. त्यानंतर, सामानाची तपासणी केली असता, अनेक परदेशी वन्यजीव प्रजाती बेकायदेशीरपणे नेल्या जात असल्याचे आढळून आले. खालील प्रजाती जप्त करण्यात आल्या:
1. गार्टर स्नेक (Thamnophis spp.) – 2
2. ऱ्हायनोसॉरस रॅट स्नेक (Gonyosoma boulengeri) – 5
3. अल्बिनो रॅट स्नेक (Pantherophis guttatus) – 1
4. केनिअन सँड बोआ (Gongylophis colubrinus) – 2
5. कोस्टल बँडेड कॅलिफोर्निया किंग स्नेक (Lampropeltis californiae) – 1
6. अल्बिनो होंडुरन मिल्क स्नेक (Lampropeltis triangulum hondurensis) – 5
हे प्राणी 28 जून 2025 रोजीच्या पंचनाम्याअंतर्गत जप्त करण्यात आले. सदर प्रवाशाला सीमाशुल्क अधिनियम, 1962 च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे.



***
M.Pange/S.Patil/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2140526)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English