पोलाद मंत्रालय
नागपूरच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे.द्वारे एन.एस.एस. सामाजार्थिक सर्वेक्षण–80 व्या दौरावर तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
Posted On:
28 JUN 2025 8:55PM by PIB Mumbai
नागपूर 28 जून 2025
केंद्रीय सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (, रा.सा.का.) (फील्ड ऑपरेशन्स डिव्हिजन), प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांच्या वतीने एन.एस.एस. सामाजार्थिक सर्वेक्षण – 80 व्या फेरी अंतर्गत घरगुती पर्यटन खर्च सर्वेक्षण यावर तीन दिवसीय प्रादेशिक प्रशिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. या प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन २५ जून २०२५ रोजी , MECL, सेमिनरी हिल्स, नागपूर येथील सभागृहात करण्यात आले.

श्री रंगा श्रीनिवासुलु, संचालक व नियंत्रण अधिकारी, रा.सा.का. (क्षेत्र संचालन प्रभाग), प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी उद्घाटन भाषणात उपस्थित मान्यवर व प्रशिक्षणार्थी यांचे स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणात या सर्वेक्षणाचे महत्त्व विषद केले व सांगितले की पर्यटन मंत्रालयाच्या गरजेनुसार घरेलू पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि रेल्वे मंत्रालयाच्या गरजेनुसार राष्ट्रीय घरेलू प्रवास सर्वेक्षण (जुलै २०२५ ते जून २०२६) सध्या सुरू असलेल्या एन.एस.एस. च्या 80 व्या दौराचा भाग असतील. पर्यटन उद्योग रोजगार निर्मितीसाठी महत्त्वाचा स्रोत असून तो जी.व्ही.ए. मूल्यांकनात अप्रत्यक्ष महत्त्वाचा ठरतो.
श्री ए. एस. एन. एम. राव, संचालक, घरेलू सर्वेक्षण युनिट (रा.सा.का. यांनी सांगितले की हे सर्वेक्षण इतर मंत्रालयांच्या गरजेनुसार करण्यात येत आहे, त्यामुळे या सर्वेक्षणाची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आवाहन केले की त्यांनी प्रशिक्षणात पूर्ण लक्ष द्यावे, जेणेकरून क्षेत्र कार्याच्या वेळी गुणवत्तापूर्ण आकडेवारी गोळा करता येईल, व त्याचे परिणाम सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर दिसून येतील.

सौ. संध्या गवई, संयुक्त संचालक, डी.ई.एस., अमरावती यांनी सांगितले की हे प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाच्या डी.ई.एस. कर्मचाऱ्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल आणि या प्रशिक्षणात डी.ई.एस. कर्मचार्यांचा समावेश केल्याबद्दल त्यांनी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे आभार मानले.
श्री श्रीनिवास उप्पला, उपमहानिदेशक, आंचलिक कार्यालय, नागपूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की सामान्यतः सामाजार्थिक सर्वेक्षणे ६ महिने किंवा १ वर्षासाठी केली जातात, परंतु पहिल्यांदाच ८० वी फेरी दीड वर्षासाठी करण्यात येत आहे. त्यांनी स्पष्ट केले की या सर्वेक्षणाद्वारे घरेलू पर्यटनाचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा जाणून घेता येईल. या सर्वेक्षणात प्रवासाचे उद्दिष्ट, प्रवासाची संख्या, कालावधी, स्थळ, प्रवासाचे माध्यम व प्रवासावर झालेला खर्च यासंबंधी माहिती गोळा केली जाईल. राष्ट्रीय घरगुती प्रवास सर्वेक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे नागरिकांचा प्रवासाचा नमुना समजून घेणे होय.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्रीनिवास उप्पला, उप महानिदेशक, आंचलिक कार्यालय, नागपूर आणि आयोजक श्री रंगा श्रीनिवासुलु, संचालक व नियंत्रण अधिकारी, रा.सा.का. (क्षे.सं.प्र.), प्रादेशिक कार्यालय, नागपूर तसेच श्री एल.एम. जाडेजा, संचालक, आंचलिक कार्यालय, नागपूर; श्री निर्णय प्रताप सिंह, उप संचालक, आंचलिक कार्यालय; श्री ए.जी. वागडे, सहायक संचालक, आंचलिक कार्यालय आणि श्री सुनील वैरागडे, सहायक संचालक, प्रादेशिक कार्यालय, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, HSU तसेच डी.ई.एस. चे अधिकारी आणि कर्मचारीही या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री सुशील मोहन, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, रा.सा.का. (क्षेत्र संकार्य प्रभाग), प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी केले व श्री प्रवीण कुमार गोखे, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी, रा.सा.का. (क्षेत्र संकार्य प्रभाग), प्रादेशिक कार्यालय, नागपूर यांनी आभार प्रदर्शन केले.
***
DW/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2140500)
Visitor Counter : 3