दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्र आणि गोवा विभागाच्या संचार लेखा नियंत्रकांद्वारे त्रैमासिक पेन्शन अदालत आणि दूरसंचार आउटरीच कार्यक्रमाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 27 JUN 2025 7:00PM by PIB Mumbai

मुंबई, 27 जून 2025

 

महाराष्ट्र आणि गोवा विभागाच्या संचार लेखा नियंत्रक (सीसीए) कार्यालयाने 27, जून 2025 रोजी छत्रपती संभाजी नगर येथील सीसीए प्रादेशिक कार्यालयात त्रैमासिक पेन्शन अदालत आणि दूरसंचार  आउटरिच कार्यक्रम आयोजित केला होता.

महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे संचार लेखा नियंत्रक डॉ. सतीश चंद्र झा यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र आणि गोव्याचे  संचार लेखा उप-नियंत्रक डॉ. तेजस रमाकांत महिरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पेन्शन अदालतमध्ये महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळातील दूरसंचार विभाग आणि बीएसएनएलच्या निवृत्त कर्मचारी आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनधारकांच्या  पेन्शनशी संबंधित 38 तक्रारींचे निराकरण करण्यात आले. या सत्रादरम्यान सर्व तक्रारींचे निराकरण करण्यात आले, सुनावणीच्या वेळापत्रकाची पूर्वसूचना एसएमएस, ईमेल किंवा पोस्टद्वारे संबंधितांना देण्यात आली. निवृत्तीवेतनधारकांसाठी सुलभता आणि सन्मान सुनिश्चित करण्यासाठी निवृत्तीवेतन संबंधी  तक्रारींचे वेळेवर आणि प्रभावी निराकरण करण्याचे महत्त्व डॉ. झा यांनी अधोरेखित केले.

दुपारच्या सत्रात आयोजित दूरसंचार आउटरिच कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी नगर आणि आसपासच्या  सेकंडरी स्विचिंग एरिया (SSA) मधील 48 परवानाधारकांना सहभागी करून घेण्यात आले. या कार्यक्रमात परवाना शुल्काचा वेळेवर भरणा , लेखापरीक्षण केलेले  तिमाही आणि वार्षिक आर्थिक दस्तावेज सादर करणे, बँक हमींचे नूतनीकरण आणि महसूल व्यवस्थापन सॉफ्टवेअर (SARAS) ची कार्यक्षमता या बाबींचा समावेश होता.

डॉ. झा यांनी डिजिटल इंडिया अभियानाला  चालना देण्यासाठी आणि ग्रामीण आणि निम-शहरी भागात इंटरनेट सुविधेचे लोकशाहीकरण करण्यात स्थानिक आयएसपी ऑपरेटर्सची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली तसेच  परवानाधारकांना नियामक दायित्वांचे पालन करण्याचे आवाहन केले.

महाराष्ट्र आणि गोवा विभागाचे संचार लेखा नियंत्रक निवृत्तीवेतन आणि दूरसंचारशी संबंधित दोन्ही बाबींमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि हितधारकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2140263) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English