दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
महाराष्ट्र आणि गोवा मंडळाच्या संचार लेखा नियंत्रकांनी आयोजित केली योग कार्यशाळा
Posted On:
21 JUN 2025 8:42PM by PIB Mumbai
मुंबई, 21 जून 2025
11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाच्या संचार लेखा नियंत्रक (सीसीए) कार्यालयाने मुंबईतील सांताक्रूझ (पश्चिम) येथील कार्यालयाच्या आवारात योग कार्यशाळेचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम संचार लेखा नियंत्रक (महाराष्ट्र आणि गोवा) डॉ. सतीश चंद्र झा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

कामाच्या ठिकाणी तणाव कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी योगासारख्या आरोग्यदायी पद्धती अत्यंत उपयुक्त आहेत, असे डॉ. सतीश चंद्र झा यांनी आपल्या भाषणात सांगितले. कर्मचाऱ्यांच्या उत्साही सहभागाबद्दल त्यांनी कौतुक व्यक्त करत कार्यालय यामध्ये निरोगी आणि संतुलित कामकाजाच्या वातावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी विभागाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
ही कार्यशाळा प्रसिद्ध योग प्रशिक्षक शोभा दिनेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. जयस्वाल यांनी सहभागी सदस्यांना योगासने, श्वसनाचे व्यायाम आणि विश्रांती तंत्रे शिकवली. योगाच्या सर्वांगीण फायद्यांवरील त्यांच्या तज्ञ सूचना आणि अभ्यासपूर्ण भाष्य उपस्थितांनी मन:पूर्वक स्वीकारले.

या कार्यशाळेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साही सहभाग दिसून आला. कर्मचाऱ्यांमध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्याची जाणीव निर्माण करून योगासनांना त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवण्यासाठी प्रोत्साहित करणे हे कार्यशाळेचे उद्दिष्ट होते. या कार्यशाळेचा समारोप आभार प्रदर्शन आणि योगासाधनेला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला.
* * *
PIB Mumbai | M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138608)