आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानाने (एआयआयए) 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन केला उत्साहाने साजरा

Posted On: 21 JUN 2025 8:15PM by PIB Mumbai

गोवा, 21 जून 2025

 

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (एआयआयए), या संस्थेने 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) मोठ्या उत्साहात आणि लक्षणीय उपस्थितीत साजरा केला. गोव्यातील मापुसा येथील पेडेम मधल्या गोवा संकुलातील इनडोअर स्टेडियम येथे "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग" या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे शीर्षक ‘योग संगम’ असे होते. हा कार्यक्रम म्हणजे सर्वांगीण आरोग्यवर्धनासाठी योगाच्या एकत्रित शक्तीचे प्रतीक आहे.

गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता सुरेश नागवेंकर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. या सत्राचे अध्यक्षपद गोव्यातील भारतीय आयुर्वेद संस्थान’च्या अधिष्ठाता प्रा. डॉ. सुजाता कदम यांनी भूषवले.

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कॉमन योगा प्रोटोकॉलचे सामूहिक सादरीकरण. या सादरीकरणात 650 पेक्षा जास्त उत्साही लोक सहभागी झाले. यामध्ये गोव्याच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान मधील विद्यार्थी आणि प्राध्यापक, खेलो इंडियाचे प्रशिक्षणार्थी, गोवा क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी, विविध राज्य आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी, संस्थांचे प्रतिनिधी आणि सामान्य जनता यांचा समावेश होता.

डॉ. गीता नागवेंकर यांनी त्यांच्या मुख्य भाषणात, शारीरिक आणि मानसिक आरोग्यवर्धनाला प्रोत्साहन देण्यात आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व अधोरेखित केले.

   

प्रा. डॉ. सुजाता कदम यांनी आपल्या भाषणात सर्वांगीण आरोग्य आणि शाश्वत जीवनशैलीत योग आणि आयुर्वेदाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान दिल्ली आणि गोवा दरवर्षी समर्पण आणि उत्साहाने आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करतात हे कदम यांनी अभिमानाने सांगितले. गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानने यावर्षी 100 दिवसांची योग दिन साजरीकरण मोहीम राबवली होती. या मोहिमेत 100 पेक्षा जास्त कार्यक्रमांचा समावेश होता. यामध्ये हरित योग मोहीम, ऐतिहासिक आणि वारसा स्थळी योग, ज्येष्ठ नागरिकांसाठी योग समावेश, अय्यंगार योग कार्यशाळा आणि विविध शैक्षणिक स्पर्धा यांचा समावेश होता.

गोव्यातील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान’चे सहयोगी अधिष्ठाता प्रो. डॉ. मोहन जोशी यांनी लघु चित्रफिती सामायिक करून संस्थेने राबविलेल्या 100 दिवसांच्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्व सहभागी, संस्थात्मक सहयोगी, गोवा क्रीडा प्राधिकरण, खेलो इंडिया, गोवा पर्यटन विकास महामंडळ आणि सर्व सहाय्यक संस्थांचे आभार मानले.

या कार्यक्रमात, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योग दिन संदेशाचे थेट प्रसारण दाखवण्यात आले. “अकरा वर्षांनंतर, योग जगभरातील लाखो लोकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे,” असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले. योगाच्या सामूहिक महत्त्वावर भर देत पंतप्रधान म्हणाले की “योग ही एक वैयक्तिक साधना आहे – जी आपल्याला ‘मी’ पासून ‘आपण’ पर्यंत घेऊन जाते”. 

 

* * *

PIB Panaji | M.Pange/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2138589)
Read this release in: English