अणुऊर्जा विभाग
टाटा मेमोरियल सेंटरकडून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बालरुग्ण, त्यांचे पालक आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष योग सत्राचे आयोजन
Posted On:
21 JUN 2025 7:40PM by PIB Mumbai
मुंबई, 21 जून 2025
11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या (IDY) देशव्यापी उत्सवाचा एक भाग म्हणून, टाटा मेमोरियल सेंटर (TMC) ने आपल्या ImPaCCT फाउंडेशनच्या (बाल कर्करोग रुग्णांना सहाय्य करणारी संस्था) सहकार्याने आज 21 जून 2025 रोजी बालरुग्ण, त्यांचे पालक आणि कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष योग सत्र आयोजित केले होते.

हे सत्र सकाळी 9:30 वाजता, फोयर एरिया, 10 वा मजला, होमी भाभा ब्लॉक, टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई येथे झाले. हा उपक्रम या वर्षीच्या - "एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग", या संकल्पनेवर आधारित असून पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या माध्यमातून जागतिक एकता, सर्वांगीण आरोग्य आणि प्रतिबंधात्मक आरोग्याला प्रोत्साहन देणे, हा याचा उद्देश आहे.

योग दिन 2025 च्या निमित्ताने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, सल्लागार मंडळ सदस्य, कैवल्यधामचे सल्लागार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, आयुष मंत्रालयाच्या सीसीआरएएस - सीएआरआय मुंबईतील संशोधन अधिकारी (आयुर्वेद) डॉ. मनोहर गुंडेटी यांचा समावेश होता.

निरोगी आयुष्य मोहिमेचा भाग म्हणून, टाटा मेमोरियल सेंटरच्या बाल रुग्ण बाह्य रुग्ण विभागात 1 एप्रिलपासून नियमित योगासने सुरू करण्यात आली होती. आजचे विशेष सत्र हे त्या आरोग्यवर्धक मोहिमेचे सांगता सत्र होते. या कार्यक्रमामुळे वैद्यकीय उपचारांपेक्षाही व्यापक आणि काळजी प्रदान करणाऱ्या उपक्रमाची सांगता झाली. कर्करोगाशी झुंजणाऱ्या मुलांसाठी, योग केवळ शारीरिक व्यायाम नाही तर मानसिक धैर्य वाढवतो, भावनिक समतोल साधतो आणि बरे होण्याच्या प्रक्रियेला आधार देतो.
* * *
PIB Mumbai | M.Pange/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2138556)