पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत पर्यटन छत्रपती संभाजीनगर यांनी वेरूळ लेणी परिसरात आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 केला साजरा

Posted On: 21 JUN 2025 3:55PM by PIB Mumbai

मुंबई, 21 जून 2025

 

भारतपर्यटन - छत्रपती संभाजीनगर यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर परिमंडळ आणि सात महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी छत्रपती संभाजीनगर यांच्या सहकार्याने आज, 21 जून 2025 रोजी प्रतिष्ठित वेरूळ लेण्यांमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 साजरा केला.

एका अभ्यासपूर्ण सत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली, ज्यामध्ये समकालीन जीवनात योग आणि ध्यान धारणेची मुख्य तत्वे आणि त्याचे प्रचंड महत्त्व अधोरेखित करण्यात आले. योगाभ्यासाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभांवर भर देत, या सत्राने उपस्थितांना  योग ही एकात्म आणि परिवर्तनकारी साधना म्हणून स्वीकारण्यास प्रेरित केले. नियमित योगाभ्यासामुळे आरोग्य सुधारते, ताण कमी होतो आणि आंतरिक आणि सामुदायिक सुसंवाद कसा वाढतो हे या सत्रातून स्पष्ट केले.

अनुभवी योग तज्ञ  रसिका मोरे यांनी एक विशेष योग प्रात्यक्षिक आयोजित केले. त्यांनी कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार विविध आसने आणि श्वासोच्छवासाच्या तंत्रांद्वारे सहभागींना मार्गदर्शन केले, सर्व वयोगटातील लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात योगाभ्यासाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले.

या कार्यक्रमाला गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब, खुलताबादचे तहसीलदार स्वरूप कंकाळ, इंडियाटुरिझम छत्रपती संभाजीनगरचे वरिष्ठ अधिकारी कर्नल एस. अयप्पा, वेरूळ लेणी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या संवर्धन सहाय्यक स्नेहल पाटील, आर. वाकलेकर आणि सात महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सन्माननीय पाहुणे, आमदार प्रशांत बंब यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि निरोगी आणि संतुलित जीवन जगण्यात योगाभ्यासाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली.

   

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेण्यांमुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुनादाची जोड मिळाली. या  ऐतिहासिक स्थळाच्या शांत आणि सुंदर  वातावरणाने भारताच्या समृद्ध वारशात रुजलेल्या उत्सवासाठी पूरक पार्श्वभूमी प्रदान केली. या कार्यक्रमात इंडियाटुरिझम छत्रपती संभाजीनगर आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स आणि पर्यटन हितधारकांसह 550  पेक्षा जास्त उत्साही लोक सहभागी झाले.

वेरूळ लेणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 संस्मरणीय आणि यशस्वी करण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय पाठिंब्याबद्दल भारत पर्यटन छत्रपती संभाजीनगरने सर्व भागीदार, स्वयंसेवक आणि सहभागींचे मनापासून आभार मानले.

 

* * *

PIB Mumbai | M.Pange/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2138391)
Read this release in: English