अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीजीएसटी मुंबई क्षेत्रने सुरू केले जीएसटी नोंदणी तक्रार निवारण केंद्र


सीजीएसटी मुंबई क्षेत्रने स्थापित केली त्रासमुक्त जीएसटी नोंदणीसाठी समर्पित सहाय्य प्रणाली

Posted On: 13 JUN 2025 10:19PM by PIB Mumbai

 

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) नोंदणी दरम्यानच्या समस्यांचा सामना करणाऱ्या करदात्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई क्षेत्र यांनी एक समर्पित तक्रार निवारण यंत्रणा सुरू केली आहे. केंद्रीय अधिकारक्षेत्रातील ज्या अर्जदारांना विलंब किंवा इतर समस्या उद्भवत आहेत ते आता reg-cgstmz[at]gov[dot]in या ईमेल पत्त्यावर त्यांच्या तक्रारी कळवू शकतात. नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे, विलंब कमी करणे, तसेच व्यवसायसुलभता सुधारणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. मुंबई क्षेत्र युनिटच्या करदाता सेवा संचालनालयाचे प्रधान अतिरिक्त महासंचालक सुमित कुमार यांनी प्रसारित केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले.

जीएसटी नोंदणी तक्रार कशी करावी?

जीएसटी नोंदणीसाठी अर्ज करताना तुम्हाला काही समस्या येत असतील, तर खालील गोष्टींसह ईमेल पाठवा:

1. अर्ज संदर्भ क्रमांक (एआरएन)

2. अधिकारक्षेत्र (तुम्ही केंद्राच्या अंतर्गत आहात का राज्याच्या अंतर्गत)

3. उद्भवलेल्या समस्येचे संक्षिप्त आणि स्पष्ट वर्णन

संबंधित विभागाकडून अर्ज केलेल्या तक्रारींचे निवारण केले जाईल आणि अर्जदारांना माहिती दिली जाईल.

सहाय्यासाठी नोडल अधिकारी:

व्यापारी संघटना/ करदाते जीएसटी नोंदणीशी संबंधित तक्रारींसाठी पुढील नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात:

फिरदौस पगारकर, उपायुक्त, सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, मुंबई क्षेत्र.

संपर्क क्रमांक: 22001974 विस्तार. 504 / 22004257; Email:reg-cgstmz[at]gov[dot]in

अप्रत्यक्ष कर तक्रारी, करदात्यांचे शिक्षण आणि अभिप्राय याबाबतच्या अतिरिक्त मदतीसाठी व्यापारी संघटना आणि करदाते करदाता सेवा महासंचालनालय (डीजीटीएस), मुंबई क्षेत्रीय युनिटशी संपर्क साधू शकतात.

श्री सुनील आहेर, एएडी, डीजीटीएस, एमझेडयु आणि श्री आदित्य जैस्वाल, निरीक्षक, डीजीटीएस, एमझेडयु. Emails: mzu-dgtps[at]gov[dot]in or dgts.mumbai[at]gmail[dot]com

संपर्क क्रमांक: 022-20832086

पार्श्वभूमी आणि अधिकृत सूचना:

हा उपक्रम केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाच्या (सीबीआय सी) सीएसटी नोंदणीला गती देण्याच्या आणि सुलभ करण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग आहे, असे निर्देश क्रमांक 03/2025 दिनांक 17.04.2025 नुसार सांगण्यात आले. याची औपचारिक घोषणा व्यापार सूचना क्रमांक 02/पीसीसीओ/मुंबई/2025/सीजीएसटी दिनांक 15.05.2025 द्वारे करण्यात आली.

अधिक संपर्कासाठी: श्री प्रदीप झाझरिया, सहायक संचालक, डीजीटीएस, मुंबई क्षेत्रीय युनिट

मोबाईल : 9833343266; ईमेल: mzu-dgtps[at]gov[dot]in किंवा dgts.mumbai[at]gmail[dot]com

***

Y.Rane/N.Mathure/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2136311) अभ्यागत कक्ष : 52
Read this releasein: English