दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ग्यान पोस्ट सेवेचा शुभारंभ -पुस्तकांच्या किफायतशीर दरातील वितरणासाठीची नवीन टपाल सेवा

Posted On: 12 JUN 2025 5:01PM by PIB Mumbai

मुंबई , 12 जून  2025
 

 

दळणवळण मंत्रालयाच्या अखत्यारीतील टपाल विभागाने ग्यान पोस्ट या नव्या टपाल सेवेचा प्रारंभ केला असल्याची घोषणा केली आहे. ही सेवा शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक पुस्तकांचे  किफायतशीर दरात वितरण करण्यासाठी  समर्पित असून, प्रत्यक्षात 1 मे 2025 पासून ही सेवा सुरू झाली असल्याची माहितीही मंत्रालयाने दिली आहे.

या उपक्रम नवीन शैक्षणिक धोरणाच्या उद्दिष्टांचा अनुसरूनच आखला गेला आहे. दुर्गम आणि ग्रामीण भागांसह संपूर्ण भारतात मुद्रित शैक्षणिक साहित्य अधिक सुलभरित्या आणि परवडणाऱ्या दरात पोहचवून शैक्षणिक दरी कमी करणे, हे या सेवेचे उद्दिष्ट आहे.

ग्यान पोस्ट ही सेवा सर्व टपाल विभागाच्या विभागीय टपाल कार्यालयांमध्ये सुरू आहे, तसेच या सेवेअंतर्गत पात्र पुस्तक संचांसाठी   ट्रेसेबल सरफेस मेल सेवाही  उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ग्यान पोस्ट सेवेची ठळक वैशिष्ट्ये:

  • 01 मे 2025 पासून सर्व विभागीय टपाल कार्यालयांमध्ये उपलब्ध.
  • केवळ बिगर-व्यावसायिक मुद्रित शैक्षणिक सामग्रीचे वितरण.
  • किमान दर: 300 ग्रॅमपर्यंतच्या संचांसाठी 20 रुपये.
  • कमाल दर: 5 किलोग्रॅमपर्यंतच्या संचांसाठी 100 रुपये (लागू असलेले कर वगळून).
  • पारदर्शकता आणि विश्वासार्हतेच्या अनुषंगाने ट्रॅकिंग सुविधेची सोय उपलब्ध.
  • पात्रतेचे कठोर निकष: व्यावसायिक जाहिरातींचा अंतर्भाव नसलेल्या तसेच प्रचारात्मक सामग्री नसलेल्या पुस्तकांसाठीच केवळ ही सेवा दिली जाईल. प्रत्येक सामग्रीवर मुद्रक अथवा प्रकाशकाचे नाव असणे अनिवार्य केले आहे.

ही सेवा भारतीय टपाल सेवेच्या सर्वांसाठी शिक्षण या उद्दिष्टाला पाठबळ देण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. या सेवेमुळे शैक्षणिक साहित्य सुलभतेने उपलब्ध होण्यासोबतच ते प्रत्येक घटकांपर्यंत पोहचू शकणार आहे.

या सेवेविषयी अधिक माहितीसाठी, ग्राहक त्यांच्या जवळच्या टपाल कार्यालयाशी संपर्क साधू शकतत किंवा www.indiapost.gov.in या भारतीय टपाल सेवेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.


S.Kakade/T.Pawar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2135986) अभ्यागत कक्ष : 28
Read this releasein: English