अर्थ मंत्रालय
मुंबई विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत परदेशी नागरिकाकडून 5 किलो कोकेन जप्त
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2025 9:58PM by PIB Mumbai
विशिष्ट माहितीच्या आधारे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभाग - एआययूच्या अधिकाऱ्यांनी आज (02.06.2025) एका परदेशी नागरिकाला थांबवून त्याची तपासणी केली. तेव्हा, त्याची झडती घेतली असता त्याने कंबरदुखीवर उपचारासाठी वापरला जाणारा पट्टा आणि पोटऱ्यांना आधारासाठी लावलेल्या पट्ट्या परिधान केल्याचे दिसून आले. अधिक तपासणीअंती या पट्ट्यांमध्ये लपविलेली पांढरी पूड भरलेली चार पाकीटे आढळली. अंमली पदार्थ तपासणीसाठी चाचणी केली असता ही पूड कोकेन असल्याचे स्पष्ट झाले. एकूण 5194 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 51.94 कोटी रुपये किंमत आहे. जप्तीनंतर या परदेशी नागरिकाला अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्ती आणि टोळ्यांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

***
ShaileshP/Reshma/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2133478)
आगंतुक पटल : 10
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English