संरक्षण मंत्रालय
कुलाबा येथील लष्करी प्रशिक्षण क्षेत्रात संयुक्त आंतरसेवा सुरक्षा सराव
प्रविष्टि तिथि:
02 JUN 2025 5:07PM by PIB Mumbai
मुंबई, 2 जून 2025
नव्या प्रकारचे वाढते धोके आणि सध्याची चिघळलेली सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय लष्कराच्या वतीने एक उच्चस्तरीय संयुक्त आंतरसेवा सुरक्षा सराव 30 आणि 31मे 2025 रोजी मुंबईत कुलाबा येथील लष्करी प्रशिक्षण क्षेत्रात आणि फोर्स वन प्रशिक्षण क्षेत्रात घेण्यात आला. याचा समारोप मुंबई शेअर बाजार (बीएसई) येथे झाला.
भारतीय लष्कर, नौदल, हवाईदल, तटरक्षक दल, फोर्स वन (महाराष्ट्र) आणि मुंबई पोलीस यांच्या समन्वयाने हा व्यापक, दोन दिवसीय सराव झाला. विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय वाढवणे, परिचालन सज्जता तपासणे, आणि बहुआयामी सुरक्षा परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी एकत्रित प्रतिसाद प्रणालींची पडताळणी करणे हा सरावाचा मुख्य उद्देश होता.
या सरावात खालील गुंतागुंतीच्या परिस्थितीसंदर्भात सराव करण्यात आला
(a) समन्वित डावपेचविषयक प्रतिसाद
(b) शीघ्र तैनाती कार्यवाही
(c) क्षेत्र निर्जंतुकीकरण आणि धोका निराकरण प्रक्रिया
(d) जखमींना सुरक्षित स्थळी हलविणे
(e) संयुक्त नियंत्रण आणि आदेश प्रणालीचे अनुकरण
या सर्व परिस्थितींचे अनुकरण सरावादरम्यान ठराविक वेळेच्या मर्यादेत केल्यामुळे वास्तववादी परिस्थितीत ताणाच्या स्थितीत निर्णय घेण्याची चाचणी घेता आली. हा सराव अंतर्गत नियमावली पालन घोटून घेणे आणि संकेत संवाद व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी आणि सहभागी सुरक्षा यंत्रणांमधील एकत्रित दृष्टिकोन बळकट करण्यासाठी एक महत्त्वाचा मंच ठरला.
या सरावाच्या दरम्यान सर्व सहभागी सेवा दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, त्यांनी कार्यवाहीचे निरीक्षण केले आणि मानक कार्यपद्धतीं- (एसओपी) -ची काटेकोर अंमलबजावणी होत आहे यावर लक्ष दिले. या सरावात दिसून आलेली निपुणता आणि सुसूत्रता ही भारताच्या बळकट बहुयंत्रणा सुरक्षा व्यवस्थेची साक्ष देतानाच कोणताही धोका उद्भवल्यास त्वरित आणि एकत्रित प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविते.
संयुक्त सरावाचा हा उपक्रम देशाच्या संरक्षण दलांची आणि अंतर्गत सुरक्षा यंत्रणांची राष्ट्रीय महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचे रक्षण करण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेप्रती असलेल्या वचनबद्धतेची साक्ष आहे.
N.Chitale/R.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2133301)
आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English