कृषी मंत्रालय
हिंगोली येथे शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागाने 'विकसित कृषी संकल्प अभियानाचा' आरंभ
प्रविष्टि तिथि:
30 MAY 2025 12:20PM by PIB Mumbai
मुंबई, 30 मे 2025
महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यात 29 मे 2025 रोजी विकसित कृषी संकल्प अभियानाचा (VKSA) आरंभ करण्यात आला. जगन्नाथ पुरी येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले, त्याचे वेबवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. कळमनुरी तालुक्यातील भोसी आणि तोंडापूर तसेच सेनगाव तालुक्यातील ताकतोडा, साबलखेडा आणि कहकर या गावांमध्येही याच वेळेस या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील तरुणांनी मोठ्या संख्येने सक्रियपणे सहभागी होऊन आधुनिक कृषी पद्धतींमध्ये असलेले स्वारस्य दाखवले. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राचे (KVK), प्रमुख डॉ. पी. पी. शेळके तसेच नोडल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या रोहिणी शिंदे, एसएमएस (गृह अर्थशास्त्र) यांच्या देखरेखीखाली हे कार्यक्रम पार पडले.. इफ्को आणि इंडियन पोटॅश लिमिटेडच्या प्रतिनिधींनी देखील त्यामध्ये सहभागी होऊन ड्रोनद्वारे कृषी फवारणीचे प्रात्यक्षिक दाखवून शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देणे शक्य असल्याचे स्पष्ट केले. नागपूरच्या एनआरसीसीमधील शास्त्रज्ञ डॉ. तिरुग्नानवेल आणि डॉ. कदम यांनीही उपस्थित राहून शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या विविध कार्यक्रमांचे नेतृत्व करणाऱ्या पथकांमध्ये डॉ. अतुल मुराई, एसएमएस (कृषी विस्तार), अनिल ओळंबे, एसएमएस (फॉर्टिकल्चर), आणि राजेश भालेराव, एसएमएस (कृषीशास्त्र) यांचा समावेश आहे. त्यांना शास्त्रज्ञ साईनाथ खरात, डॉ. कैलास गिते आणि अजयकुमार सुगावे, एसएमएस (वनस्पती संरक्षण) यांनी सक्षमपणे सहाय्य केले. प्रभावाचे मूल्यांकन करण्यासाठी आणि भविष्यात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये सूचनांचा अंतर्भाव करण्याच्या अनुषंगाने सहभागी शेतकऱ्यांचा अभिप्राय काळजीपूर्वकपणे नोंदविण्यात आला.



***
S.Bedekar/M.Ganoo/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2132786)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English