विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
नागपूरच्या सीएसआयआर-नीरी द्वारे "ऊर्जा संवाद: स्वच्छ, व्यवहार्य, समावेशक" या विषयावर विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
27 MAY 2025 9:40PM by PIB Mumbai
नागपूर, 27 मे 2025
नागपूरच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (सीएसआयआर -नीरी) 27 मे 2025 रोजी नागपूरच्या रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉइंट येथे “ऊर्जा संवाद: स्वच्छ, व्यवहार्य, समावेशक” या विषयावर विचारमंथन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आयआयटी जोधपूरचे संचालक प्रा. अविनाश कुमार अग्रवाल आणि सन्माननीय पाहुणे कपूरथला येथील एसएसएस-एनआयबीई चे महासंचालक डॉ. जी. श्रीधर आणि भोपाळच्या सीएसआयआर-एएमपीआरआय चे संचालक डॉ. थल्लदा भास्कर यांनी केले.



“शाश्वत वाहतुकीसाठी ई-इंधन स्वीकारण्याच्या संधी आणि आव्हाने” या विषयावरील सर्वंकष भाषणात, प्रा. अग्रवाल यांनी ऊर्जा वापर आणि दरडोई जीडीपी यांच्यातील मजबूत सहसंबंध अधोरेखित केले. शाश्वत विकास सुनिश्चित करण्यासाठी भारताने अधिक ऊर्जा-कार्यक्षम बनले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. त्यांनी निदर्शनास आणून दिले की जागतिक सरासरी दरडोई जीएचजी उत्सर्जन 63 tCO2e (2020) असले तरी, भारताचे दरडोई उत्सर्जन 6992 kWh/p (2021) आहे. असे असूनही, जागतिक जीएचजी उत्सर्जनात भारताचे योगदान 4% पेक्षा कमी आहे, असेही त्यांनी सांगितले. जागतिक तापमानवाढ 1.5°C पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी, त्यांनी नवीकरणीय ऊर्जेचा वाटा वाढवण्याची, अंतिम वापराच्या क्षेत्रांचे विद्युतीकरण करण्याची आणि बायोमास-सक्षम कार्बन कॅप्चरचा वापर करण्याची शिफारस केली.
मिथेनॉल आणि डायमिथाइल इथर (डीएमई) हे भारतासाठी "सहज उपलब्ध होणारे" असून त्यांना प्राधान्य दिले पाहिजे असे सांगत प्रा. अग्रवाल यांनी जैवइंधनाचे महत्व अधोरेखित केले. आयात केलेल्या जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी मिथेनॉल अर्थव्यवस्था महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले. त्यांनी राष्ट्रीय कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) उत्पादन आणि कार्बन कॅप्चर, वापर आणि साठवणूक (सीसीयूएस) यासह अमोनियाला किफायतशीर आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ऊर्जा वाहक म्हणून देखील अधोरेखित केले.
डॉ. जी. श्रीधर यांनी त्यांच्या भाषणात बायोमास आणि जैवऊर्जेवरील सरकारच्या प्रमुख मोहिमांवर प्रकाश टाकला आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणासाठी त्यांच्या परिवर्तनीय क्षमतेवर भर दिला. भारत दरवर्षी सुमारे 230 दशलक्ष मेट्रिक टन बायोमास तयार करतो, ज्यामध्ये कृषी-अवशेषांचा समावेश असून तो स्वच्छ आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करण्याची एक प्रचंड संधी दर्शवतो याबाबत त्यांनी अवगत केले. ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकणाऱ्या बायोमास-आधारित ऊर्जा प्रणालींना प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर डॉ.श्रीधर यांनी भर दिला.
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2131838)
आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English