ऊर्जा मंत्रालय
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने 2024–25 या आर्थिक वर्षाचे वित्तीय निकाल केले जाहीर, वार्षिक नफ्याचा ऐतिहासिक उच्चांक
प्रविष्टि तिथि:
21 MAY 2025 6:38PM by PIB Mumbai
मुंबई, 21 मे 2025
ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील कंपनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएफसी) ने आज (21 मे 2025) मुंबईत एका कार्यक्रमात 2024–25 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करत, पीएफसीने आजवरील सर्वाधिक वार्षिक नफा नोंदवून भारतीय आर्थिक क्षेत्रातील आपले नेतृत्व व स्थैर्य अधोरेखित केले आहे.

कार्यक्रमात बोलताना पीएफसीच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक परमिंदर चोप्रा म्हणाल्या, “एकत्रित आणि स्वतंत्र अशा दोहोंच्या आधारे देशातील सर्वाधिक नफा कमावणारी, नवनवीन विक्रम प्रस्थापित करणारी पीएफसी एक एनबीएफसी (नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी) आहे. आम्ही 'वास्तववादी, लवचिक आणि मजबूत' भर शाश्वत विकासावर दिल्यामुळे 2024–25 हे वर्षही आमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या अत्युत्तम ठरले. आमच्या कर्जासंदर्भातील गुंतवणूक संचात 13% वाढ होणे हे ऊर्जा आणि पायाभूत सुविधांमध्ये आमच्या योगदानाचे स्पष्ट द्योतक आहे. तसेच, भरघोस लाभांश देऊन आम्ही आमच्या गुंतवणूकदारांच्या मूल्यनिर्मितीसाठी कटिबद्ध राहिलो आहोत."
एकत्रित आर्थिक ठळक बाबी
- निव्वळ नफ्यात (पीएटी) 15% वाढ – रु.26,461 कोटी (आर्थिक वर्ष 2024) ते रु. 30,514 कोटी (आर्थिक वर्ष 2025) हा आजवरचा सर्वाधिक वार्षिक नफा.
- एकूण नफातोटा पत्राचा आकार – रु. 11.70 लाख कोटींच्या पुढे, भारतातील सर्वात मोठी एनबीएफसी म्हणून पीएफसीचे स्थान कायम.
- कर्ज गुंतवणूक संचात 12% वाढ, 31.03.2024 रोजी रु. 9,90,824 कोटी पासून 31.03.2025 रोजी रु.11,09,996 कोटी
- एकत्रित निव्वळ संपत्तीत 16% वाढ, 31.03.2024 रोजी 1,34,289 कोटी ते 31.03.2025 रोजी रु.1,55,155 कोटी
- सकल एनपीएत घट होऊन आर्थिक वर्ष 2025 मध्ये 1.64%, आर्थिक वर्ष 2024 मध्ये हा आकडा 3.02%
- निव्वळ एनपीएत घट होऊन यंदा 0.38%, गेल्या वर्षी हा 0.85%.
स्वतंत्र आर्थिक ठळक बाबी
- निव्वळ नफ्यात 21% वाढ, रु. 14,367 कोटी (आर्थिक वर्ष 2024) ते रु. 17,352 कोटी (आर्थिक वर्ष 2025), यामुळे भारतातील सर्वाधिक नफा कमावणारी एनबीएफसी म्हणून पीएफसीचे स्थान कायम
- चौथ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 24% वाढ, आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीतील रु. 4,135 कोटी ते आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीत रु. 5,109 कोटी
- अंतिम लाभांश रु. 2.05 प्रति समभाग असा मंडळाचा आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीतील प्रस्ताव, त्याबरोबर पीएफसीने आर्थिक वर्ष 2025 मध्ये एकूण लाभांश रु. 15.80 प्रति समभाग दिला
- कर्ज गुंतवणूक संचात 12.81% वाढ, 31.03.2024 रोजी रु.4,81,462 कोटी ते 31.03.2025 रोजी रु. 5,43,120 कोटी
- नवीकरणीय पुस्तकाने रु. 80,000 कोटींचा टप्पा पार करून गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 35% वाढीसह 31.03.2025 रोजी रु. 81,031 कोटींची केली नोंद
- पीएफसीच्या निव्वळ संपत्तीत 31.03.2024 च्या तुलनेत 15% वाढ, रु. 90,000 कोटींचा टप्पा पार, 31.03.2025 रोजी रु. 90,937 कोटी
- केएसके महानदी प्रकरणाच्या यशस्वी निकालांती निव्वळ वार्षिक नफ्याच्या गुणोत्तरात आर्थिक वर्ष 2025 मध्ये अर्ध्या टक्क्याने घट होऊन ते 0.39%, आर्थिक वर्ष 2024 मध्ये हे गुणोत्तर होते 0.85%
- सकल निव्वळ वार्षिक नफ्यात आर्थिक वर्ष 2024 च्या तुलनेत 140 बेसिस पॉइंट्सनी घट, आर्थिक वर्ष 2025 मध्ये हे 1.94%

पीएफसी भारतातील सर्वात मोठी हरित ऊर्जा कर्ज पुरवठादार एनबीएफसी म्हणून आघाडीवर आहे. रु. 80,000 कोटींपेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जेसाठी कर्जवाढ गुंतवणूक संच आणि वर्षभरात 35% वाढ हेच या यशाचे निदर्शक आहे. स्वच्छ, मजबूत आणि शाश्वत भारताच्या उभारणीत पीएफसी महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
***
S.Patil/R.Bedekar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2130400)
आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English