आदिवासी विकास मंत्रालय
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग तीन दिवसांच्या गोवा राज्याच्या दौऱ्यावर
अनुसूचित जमातीच्या विविध समस्या आणि प्रगतीचा राज्य सरकारकडून घेतला आढावा
प्रविष्टि तिथि:
21 MAY 2025 6:43PM by PIB Mumbai
पणजी,गोवा दिनांक 20/05/2025
राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग तीन दिवसांच्या गोवा राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. आयोगाचे अध्यक्ष श्री अंतार सिंग आर्य यांच्या नेतृत्वात पूर्ण आयोगाने तीन दिवस राज्यस्तरीय आढावा घेतला. श्री आर्य यांनी या दौऱ्या संबंधीची आणि आढावा बैठकीची माहिती आज पणजी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आयोगाचे ज्येष्ठ सदस्य श्री निरुपम चकमा आणि डॉ आशा लाकरा उपस्थित होते.

आयोगाने राज्यातल्या अनुसूचित जमातीच्या विविध समस्या आणि प्रगतीचा राज्य सरकारकडून आढावा घेतला आणि काही महत्वपूर्ण सूचना आयोगाने राज्य सरकारला केल्या आहेत अशी माहिती श्री अंतार सिंग आर्य यांनी दिली.
आदिवासी युवकांमध्ये आदिवासी संस्कृती जतन करण्याची आवश्यकता असून त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याची गरज श्री आर्य यांनी व्यक्त केली. आदिवासी समुदायातील तरुणांनी मुख्य प्रवाहात सक्रिय सहभाग घेतल्यास विकास आणि प्रगती होण्यास हातभार लागेल असे हे म्हणाले.
विशेषतः गोव्यात अनेक आदिवासी व्यक्तींना जमीनदारांकडून ना हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) मिळविण्यात अडचणी येतात, ज्यामुळे त्यांना सरकारी योजना आणि लाभ मिळण्यास अडथळा येतात. त्यामुळे आदिवासींना जमिनीचे स्वामित्व हक्क (जमीन मालकी हक्क) प्रदान करणे या बाबतही आयोगाने राज्य सरकारला सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की आयोगाने तीन दिवसात घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान मिळालेल्या सर्व सूचना आणि अभिप्रायांचे दस्तऐवजीकरण केले आहे आणि त्या संबंधीचा शिफारस अहवाल तयार करून राष्ट्रपतींना सादर केला जाईल अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष श्री आर्य यांनी दिली.

अनुसूचित जमातींचे हक्क आणि कल्याण यांचे रक्षण करण्यासाठी आणि धोरणात्मक हस्तक्षेप आणि प्रशासकीय पाठिंब्याद्वारे त्यांच्या चिंता दूर केल्या जातील याची खात्री करण्यासाठी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी आज दिनांक 21 मे रोजी पूर्ण आयोगाने राज्याचे मुख्य सचिव श्री. डॉ व्ही. कंदवेलू, राज्याचे पोलिस महासंचालक श्री. आलोक कुमार यांच्यासह राज्य अनुसूचित जमाती आयोगाचे अधिकारी, तसेच आदिवासी कल्याण विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध हितधारकांशी आयोगाने आज पणजीत आढावा बैठक घेतली.
***
PIB-Panaji,Goa/NM/PK
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2130342)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English