अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी  मुंबई विमानतळावर 5.1 कोटी रुपये किमतीचे सोनं केले जप्त

प्रविष्टि तिथि: 18 MAY 2025 2:12PM by PIB Mumbai

 

प्रेस नोट (दिनांक : 17.05.2025)

सीमाशुल्क विभागाच्या मुंबई विभाग -3 येथील सीएसएमआय विमानतळ आयुक्तालयातील अधिकाऱ्यांनी 17 मे 2025 रोजी दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये एकूण 5.75 किलो सोनं जप्त केलं असून त्याची अंदाजे किंमत  5.10 कोटी रुपये इतकी आहे. हे सोनं संबंधित व्यक्तींच्या आतील कपड्यांमध्ये व जॅकेटच्या खिशामध्ये लपवलेले होते. या प्रकरणांमध्ये 2 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.

प्रकरण 1: (17.05.2025)

एका प्रतिक्षा कक्षामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला, तो कर्मचारी मार्गाने प्रस्थान क्षेत्रातून जात असताना अडवण्यात आले. त्याच्या आतील कपड्यांमध्ये लपवलेली मेणामधील सोन्याची भुकटी असलेली 6 पाकिटे हस्तगत करण्यात आली , ज्याचे निव्वळ वजन 2800 ग्रॅम (संपूर्ण वजन 2947 ग्रॅम) असून अंदाजे किंमत 2.48 कोटी रुपये आहे.  हे सोनं त्याला एका विमानतळावर अस्थायी थांबा घेतलेल्या अर्थात ट्रांझिट प्रवाशाने दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

प्रकरण 2: (17.05.2025)

एक कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या व्यक्तीला, तो प्रस्थान क्षेत्रातील कर्मचारी बाहेर पडण्याच्या ठिकाणी जात असताना अडवण्यात आले. त्याच्या अंगावरील जॅकेटच्या खिशामध्ये लपवलेली मेणामधील सोन्याची भुकटी असलेली 6 पाकिटे  हस्तगत करण्यात आली, ज्याचे निव्वळ वजन 2950 ग्रॅम (संपूर्ण वजन 3073 ग्रॅम) असून अंदाजे किंमत ₹2.62 कोटी आहे, . हे सोनं त्याला   विमानतळावर अस्थायी थांबा घेतलेल्या अर्थात एका ट्रांझिट प्रवाशाने दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

 

 

***

S.Kane/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2129432) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English