ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
बीआयएस आणि आयआयटी मुंबईच्या स्टार्टअप मेळाव्यात 100 हून अधिक स्टार्टअप्स आणि उद्योजकांचा सहभाग
आयआयटी मुंबईमधील स्टार्टअप मेळाव्यात नवोन्मेषाला चालना देण्यासाठी मानके आणि अनुरूपता मूल्यांकनाच्या महत्वाच्या भूमिकेवर देण्यात आला भर
Posted On:
16 MAY 2025 7:32PM by PIB Mumbai
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस), अर्थात भारतीय मानक ब्युरो ने आयआयटी मुंबई - सोसायटी फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रूनरशिप (एसआयएनई) च्या सहयोगाने आज आयआयटी मुंबई येथे आयोजित केलेल्या स्टार्टअप मीटमध्ये (मेळावा) स्टार्टअप्स, इनोव्हेटर्स (नवोन्मेशी) आणि नियामक तज्ञ एकत्र आले होते. हितधारकांनी यावेळी नवोन्मेशाला चालना देण्यासाठी, गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि जागतिक स्केलेबिलिटी साध्य करण्यासाठी मानके आणि अनुरूपता मूल्यांकनाच्या महत्वाच्या भूमिकेवर चर्चा केली.

या मेळाव्यात 100 हून अधिक स्टार्टअप्स आणि उद्योजकांनी भाग घेतला आणि मानकीकरणामुळे उत्पादनाची गुणवत्ता, ग्राहकांचा विश्वास आणि बाजारपेठेतील प्रवेश कसा वाढू शकतो यावरील संवाद सत्रांमध्ये ते सहभागी झाले.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा.शिरीष केदारे, एसआयएनईचे सीईओ शाजी वर्गीस, बीआयएस चे उपमहासंचालक (मानकीकरण) रीना गर्ग आणि बीआयएसचे वैज्ञानिक-एफ दीपक कुमार अग्रवाल स्टार्टअप मीट मध्ये उपस्थित होते.

स्टार्टअपच्या प्रवासात सुरुवातीपासूनच मानके समाविष्ट करून भारताच्या नवोन्मेष परिसंस्थेला प्रोत्साहन देण्याच्या बीआयएसच्या वचनबद्धतेला या मेळाव्याने बळकटी दिली.
***
S.Kane/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2129230)
Visitor Counter : 3