कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
ट्रान्सनॅशनल संघटित सायबर गुन्हे आणि डिजिटल अटकेविरोधात राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन चक्र-V अंतर्गत सीबीआयद्वारे 8 राज्यांमध्ये 42 ठिकाणी छापे, 5 जणांना अटक
सायबर गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अनधिकृत सिमकार्डच्या विक्रीवर धडक कारवाई
प्रविष्टि तिथि:
10 MAY 2025 6:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई, 10 मे 2025
सायबर गुन्हेगारी आणि डिजिटल अटकेसारख्या गुन्ह्यांच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठीच्या ऑपरेशन चक्र-V चा एक भाग म्हणून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांतर्गत, केंद्रीय अन्वेषण विभागाने सायबर गुन्हेगारांशी संबंधित असल्याचा संशय असलेले दूरसंचार ऑपरेटर्सचे एजंट तसेच डिजिटल अरेस्टसह तोतयेगिरी, फसवणूक करणाऱ्या जाहिराती, गुंतवणूक, UPI याबाबतीत फसवणूक इ. बेकायदा कृत्यांसाठी वापरली जाणारी अवैध सिम कार्ड जारी करणाऱ्या कथित दूरसंचार सेवा पुरवठादारांच्या अज्ञात अधिकाऱ्यांच्या विक्रीच्या ठिकाणांच्या परिसराच्या तपासणीचे सत्र सुरू ठेवले आहे.
दूरसंचार ऑपरेटर्सच्या विविध पॉईंट ऑफ सेल (PoS) एजंट्सद्वारे जारी केलेल्या अनधिकृत सिम कार्ड्सची विक्री आणि गैरवापर रोखण्यावर प्रकर्षाने भर देऊन करण्यात येत असलेल्या प्रयत्नांतर्गत, सीबीआयने 8 राज्यांमधील - आसाम, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तेलंगण, कर्नाटक आणि तामिळनाडूतील 38 पॉईंट ऑफ सेल (PoS) एजंट्सच्या जागांवर छापे टाकले.
या तपासणीअंती मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, केवायसी दस्तऐवजांच्या प्रती आणि अनधिकृत सिमकार्डच्या वितरणात गुंतलेल्या मध्यस्थांसह अन्य व्यक्तींची ओळख पटवणारी आणि गुन्ह्यातून मिळालेल्या पैशातून विकत घेतलेली जंगम मालमत्ता यांसारखे गुन्हेगारी दस्तऐवज/वस्तू वगैरे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
संगनमताने केवायसी नियमांचे उल्लंघन करून सिमकार्डच्या अनधिकृत विक्रीत सहभाग असल्याच्या कारणावरून सीबीआयद्वारे 4 राज्यांतील 5 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई सध्या सुरू असलेले सायबर गुन्हे आणि ते करणाऱ्या गुन्हेगारांचा गांभीर्याने बिमोड करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेचा एक भाग असून अशा गुन्ह्यांमागील पायाभूत सुविधा नष्ट करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
वरील प्रकरणाच्या पुढील तपासाचे काम सुरू आहे.
* * *
PIB Mumbai | S.Kane/M.Ganoo/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2128096)
आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English