नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
आर्थिक वर्ष 2025 मध्ये आरईसीला 15,713 कोटी रुपयांचा नफा
आरईसी ने प्रति समभाग 2.60 रुपयांच्या अंतिम लाभांशांची केली शिफारस
प्रविष्टि तिथि:
09 MAY 2025 10:35PM by PIB Mumbai
मुंबई, 9 मे 2025
आरईसी लिमिटेडच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या वर्षासाठी, लेखापरीक्षण झालेल्या स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक निकालांना मान्यता दिली.
कार्यात्मक आणि आर्थिक ठळक मुद्दे: आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीची आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहीची (स्वतंत्र) तुलना:
- वितरण: 45,538 कोटी रुपये विरुद्ध 39,374 कोटी रुपये, 16% वाढ
- निव्वळ व्याज उत्पन्न: 5,876 कोटी रुपये विरुद्ध 4,263 कोटी रुपये, 38% वाढ
- निव्वळ नफा: 4,236 कोटी रुपये विरुद्ध 4,016 कोटी रुपये, 5% वाढ
- एकूण उत्पन्न: 15,174 कोटी रुपये विरुद्ध 12,263 कोटी रुपये, 24% वाढ
कार्यात्मक आणि आर्थिक ठळक मुद्दे: आर्थिक वर्ष 2025 आणि आर्थिक वर्ष 2024 (स्वतंत्र) यांची तुलना:
- वितरण: 1,91,185 कोटी रुपये विरुद्ध 1,61,462 कोटी रुपये, 18% वाढ
- निव्वळ व्याज उत्पन्न: 19,878 कोटी रुपये विरुद्ध 15,685 कोटी रुपये, 27% वाढ
- निव्वळ नफा: 15,713 कोटी रुपये विरुद्ध 14,019 कोटी रुपये, 12% वाढ
- एकूण उत्पन्न: 55,980 कोटी रुपये विरुद्ध 47,214 कोटी रुपये ,19% वाढ
सर्व क्षेत्रांमधील वाढ, कर्ज मालमत्तेवरील व्याजदरांमध्ये फेरबदल आणि वित्त खर्चाचे प्रभावी व्यवस्थापन यामुळे, आरईसी आपला विस्तार आणि निव्वळ व्याज मार्जिन सुरक्षा (NIMs) कायम राखण्यास सक्षम आहे. यामुळे, 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या वर्षासाठी आरईसी ला कर भरणा केल्यानंतर 15,713 कोटी रुपयांचा नफा झाला. परिणामी, 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या वर्षासाठी प्रति समभाग कमाई (EPS) प्रति समभाग 59.55 रुपये (वार्षिकीकृत) झाली, जी 31 मार्च 2024 रोजी प्रति समभाग 53.11 रुपये इतकी होती.
कर्ज पुस्तिका म्हणजेच व्यवस्थापनेअंतर्गत मालमत्ता (AUM) ने आपला वाढीचा मार्ग कायम राखला.
नफ्यात वाढ झाल्यामुळे, 31 मार्च 2025 रोजी निव्वळ संपत्ती 77,638 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे, जी 31 मार्च 2024 रोजीच्या 68,783 कोटी रुपयांच्या तुलनेत 13 % ने वाढली आहे.
आपल्या भागधारकांना बक्षीस देण्याची परंपरा पुढे नेत, कंपनीच्या संचालक मंडळाने कंपनीच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांच्या मंजुरीच्या अधीन राहून प्रति इक्विटी समभाग 2.60 रुपये (प्रत्येकी 10/- रुपयांच्या दर्शनी मूल्यावर) अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे.
आरईसी लिमिटेड बद्दल अधिक माहिती
आरईसी ही भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असलेली एक 'महारत्न' कंपनी आहे आणि ती भारतीय रिझर्व बँकेत (RBI) मध्ये नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) म्हणजेच बिगर बँकिंग वित्तीय कंपनी, पब्लिक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन (PFI) म्हणजेच सार्वजनिक वित्तीय संस्था आणि इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्शियल कंपनी (IFC) अर्थात पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी म्हणून नोंदणीकृत आहे.

* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2128013)
आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English