रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पुणे रेल्वे स्थानक व पुणे डिझेल लोको शेड येथे मॉक ड्रिलचे आयोजन

Posted On: 07 MAY 2025 9:21PM by PIB Mumbai

पुणे, 7 मे 2025

 

आपत्कालीन परिस्थितींमध्ये सज्जता वाढविणे व संकटाच्या प्रसंगी प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने आज दिनांक 07 मे 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावर आरपीएफ व जीआरपी यांच्यामार्फत संयुक्त मॉक ड्रिल करण्यात आले.

या ड्रिलमध्ये आपत्कालीन परिस्थितींचे अनुकरण करून, जखमी, वृद्ध, महिला व लहान मुलांना असुरक्षित ठिकाणाहून सुरक्षित स्थळी हलविण्याचा सराव करून कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी ही माहिती देण्यात आली की, कुठलीही बेवारस वस्तू किंवा संशयास्पद व्यक्ती दिसल्यास, जवळच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना तात्काळ माहिती द्यावी; माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल.

   

या मॉक ड्रिलमध्ये प्रियांका शर्मा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, पुणे उपस्थित होत्या. आरपीएफकडून एक निरीक्षक, एक उपनिरीक्षक, पाच सहाय्यक उपनिरीक्षक, 15 कर्मचारी, श्वान पथकासह शोध श्वान, 10 एमएसएफ कर्मचारी, IPF/CIB कर्मचारी, तर जीआरपीकडून एक निरीक्षक, तीन पीएसआय व 40 कर्मचारी सहभागी झाले. याशिवाय BDDS चे चार कर्मचारी व श्वान, रूबी हॉल क्लिनिकचे वैद्यकीय कर्मचारी व स्थानिक वाहतूक पोलीसही उपस्थित होते.

   

या दरम्यान, पुणे डिझेल लोको शेड येथे वेगळी मॉक सेफ्टी ड्रिल आयोजित करण्यात आली. या ड्रिलमधून रेल्वे कर्मचाऱ्यांना आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्याचे प्रशिक्षण सिव्हिल डिफेन्स टीमकडून देण्यात आले. या प्रशिक्षणात अग्निसुरक्षा, अग्निशामक वापर आणि संकटात त्वरित निर्णय घेणे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सुमारे 300 रेल्वे कर्मचाऱ्यांनी यात सक्रीय सहभाग नोंदवला. या वेळी डीएमई/डी  दीपक खोत, एडीएमई/डी  हर्ष त्रिपाठी आणि डीएमएम/डी  सचिन गौतम उपस्थित होते.

या मॉक ड्रिल्समधून, नियमित प्रशिक्षण व जनजागृती उपक्रमांद्वारे, भक्कम सुरक्षा संस्कृती सुनिश्चित करण्याच्या मध्य रेल्वेच्या बांधिलकीचे दर्शन घडते.

 

* * *

PIB Pune | S.Nilkanth/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2127618) अभ्यागत कक्ष : 45
Read this releasein: English