पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबईच्या हॉटेल व्यवस्थापन संस्थेने (IHM) "द लीजंड्स ऑफ आयएचएम मुंबई" या नावाने कॉफी टेबल बुक (CTB) चे केले प्रकाशन

प्रविष्टि तिथि: 02 MAY 2025 1:25PM by PIB Mumbai

मुंबई, 2 मे 2025

 

"दादर  कॅटरिंग कॉलेज" या नावाने प्रसिद्ध असलेल्या आणि 1954 साली स्थापन झालेल्या मुंबईच्या आयएचएमने 29 एप्रिल 2025 रोजी मुंबईतील प्रतिष्ठित हॉटेल ताजमहाल पॅलेस येथे 70 हून अधिक माजी विद्यार्थ्यांसह कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले. महाराष्ट्र सरकारचे  पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी ख्यातनाम शेफ रणवीर ब्रार, पुसाच्या आयएचएमचे प्राचार्य कमलकांत पंत आणि मुंबईच्या आयएचएमचे प्राचार्य डॉ. निशीथ श्रीवास्तव आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत "द लीजंड्स ऑफ आयएचएम मुंबई" या नावाने कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले.

पुस्तक प्रकाशन समारंभात शशांक वर्टी (आयएचसीएलचे माजी वरिष्ठ उपाध्यक्ष), मोहन कुमार पीके (आयएचसीएलचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी), कनिका हसरत (हिल्टनच्या दक्षिण आशियाई ऑपरेशन्स विभागाच्या वरिष्ठ प्रादेशिक संचालक), मेफेअर हॉटेल्स अँड रिसॉर्ट्सच्या ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष स्टीफन बिएल, दीपक कुमार (हिल्टन मुंबईचे महाव्यवस्थापक), निश्चिंत पठानिया ( द ललित मुंबईचे महाव्यवस्थापक), समीर सूद (लीला मुंबईचे महाव्यवस्थापक), भगवान बलानी (आयटीसी मराठाचे महाव्यवस्थापक), सलील फडणीस (सहारा स्टारचे महाव्यवस्थापक), राहुल मखीजा (द पार्क हॉटेलचे महाव्यवस्थापक), मिशेलिन श्रेणीतील तारांकित शेफ मनोज वसईकर, शेफ पॉल नोरोन्हा (आयटीसी मराठाचे कार्यकारी शेफ), शेफ सुधीर पै (WICA चे उपाध्यक्ष), उद्योजक: डॉ. विठ्ठल कामत आणि विशाल कामत, (ऑर्किड हॉटेल्स), कैनाझ मेसमन (थिओब्रोमा पॅटिसेरी इंडिया), डॉ. नितीन नागराळे (व्यवस्थापक मंचाचा आदरातिथ्य खरेदी विभाग) आणि उद्योग क्षेत्रातील इतर मान्यवर उपस्थित होते.

या तारांकित उपस्थितांच्या मेळाव्यात आयएचएम मुंबईचा वारसा दाखवण्यात आला आणि एस. एल. धारगळकर (माजी प्राचार्य), ए. के. सिंग (माजी प्राचार्य), संजीव कक्कर, आयलीन सिक्वेरा, जयंत काथे, निलम नाडकर, शिल्पा माडकर, असित कुमार मिश्रा आणि डॉ. फ्रान्सिस थॉमस यांच्यासारख्या आजीमाजी प्राध्यापकांच्या शैक्षणिक सामर्थ्याचे दर्शन घडविण्यात आले.

आयएचएम मुंबईने बेनेट कोलमन अँड कंपनी लिमिटेड (बीसीसीएल) च्या सहकार्याने हे कॉफी टेबल बुक प्रकाशित केले आहे.

 

* * *

PIB Mumbai | S.Bedekar/S.Naik/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2126747) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English