रेल्वे मंत्रालय
ग्रीष्मकालीन गर्दी व्यवस्थापनासाठी पुणे रेल्वे स्थानकावर होल्डिंग क्षेत्राची उभारणी
प्रविष्टि तिथि:
25 APR 2025 10:00PM by PIB Mumbai
उन्हाळी सुट्यांमध्ये वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर, पुणे विभाग, मध्य रेल्वेने विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 च्या व्हीआयपी साइडिंगजवळ एक होल्डिंग एरिया स्थापन केला आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांसाठी सुलभता, अनावश्यक गर्दी टाळणे आणि सामान्य श्रेणीतील प्रवाशांसाठी सुरक्षित व सोयीस्कर प्रवास अनुभव सुनिश्चित करणे आहे.

होल्डिंग एरिया मध्ये प्रवाशांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये पुरेशी लाईट व्यवस्था, पंखे, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र पोर्टेबल शौचालये, डिजिटल डिस्प्ले बोर्ड आणि मदत कक्षाची सुविधा पुणे रेल्वे स्थानकावर उपलब्ध आहे.

गर्दी व्यवस्थापनासाठी 25 आरपीएफ कर्मचारी आणि 15 तिकिट तपासणी कर्मचारी पुणे रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले आहेत. यासोबतच एक वाणिज्य निरीक्षक/ पर्यवेक्षक व एक अधिकारी देखील गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी नेमले आहेत. सर्वसाधारण श्रेणीतील प्रवाशांची तिकिट तपासणी होल्डिंग एरियामध्ये करण्यात येत आहे आणि त्यानंतरच त्यांना फलाटावर प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे गर्दीमुळे घडणाऱ्या चेंगराचेंगरी सारख्या घटनांना आळा घालता येईल.
पुणे विभाग, मध्य रेल्वे, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी सातत्याने कटिबद्ध आहे आणि भविष्यातही राहील.
***
N.Chitale/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2124446)
आगंतुक पटल : 49
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English