संरक्षण मंत्रालय
नागपूर मधील वायुसेना नगर येथील हवाई दल संग्रहालयाचे एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मेंटेनन्स कमांड एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन
Posted On:
25 APR 2025 7:25PM by PIB Mumbai
नागपूर मधील वायुसेना नगर येथील हवाई दल संग्रहालयाचे 25 एप्रिल 2025 रोजी एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, मेंटेनन्स कमांड एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
हवाई दल संग्रहालयामध्ये भारतीय लष्करी हवाई वाहतुकीच्या आठवणींचा समृद्ध संग्रह आहे आणि भारतीय हवाई दलाचा इतिहास प्रदर्शित करण्यात आला आहे.
संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर एमआय 8 हेलिकॉप्टर, मिग-21 लढाऊ विमाने आणि पिचोरा क्षेपणास्त्र प्रदर्शित करण्यात आले आहे. संग्रहालयाच्या विविध विभागांमध्ये भारतीय हवाई दलाचा इतिहास, दृकश्राव्य विभाग, उपकरण प्रदर्शन विभाग, शस्त्र विभाग यांचा समावेश आहे.
संग्रहालयात फ्लाइंग सिम्युलेटर विभाग देखील आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्यांना लढाऊ विमान उड्डाणाप्रमाणे अनुभव घेता येईल.
मंगळवार व राजपत्रित सुट्ट्या वगळता सर्व दिवशी सकाळी 10.00 ते 2 आणि दुपारी 4 ते - 6 या वेळेत संग्रहालय नागरिकांसाठी खुले राहील.
हवाई दलाचा इतिहास, उत्क्रांती आणि यश जतन आणि प्रदर्शित करणे, हे हवाई दल संग्रहालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ते शिक्षण, संशोधन आणि हवाई दलाच्या जवानांचे आणि त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी व्यासपीठ मिळवून देते.








***
N.Chitale/R.Agashe/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2124435)
अभ्यागत कक्ष : 84