माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने जागतिक वारसा दिनाच्या पूर्वसंध्येला गुलशन महल इथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन
प्रविष्टि तिथि:
17 APR 2025 9:50PM by PIB Mumbai
मुंबई, 17 एप्रिल 2025
जागतिक वारसा दिनाच्या पूर्वसंध्येला, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या अखत्यारीतील भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने, संग्रहालयाच्या संस्कृती परंपरा विभागाची इमारत असलेल्या गुलशन महल इथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन केले होते. गुलशन महल ही 19 व्या शतकातील एक सुंदर वारसा इमारत आहे.

जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने गुलशन महालच्या स्थापत्यकलेच्या सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करण्याच्या उद्देशाने एका रेखाचित्र आणि छायाचित्रण स्पर्धेचेही आयोजन केले होते. या स्पर्धेत लहान मुलांपासून ते अनुभवी कलाकारांपर्यंत सर्व वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामुळे संग्रहालयाचे वातावरण सर्जनशीलता आणि उत्साहाने भारून गेले होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने जागतिक वारसा दिनाचे महत्त्वही अधोरेखित झाले. आपला सामायिक वारशाचे जतन करण्याविषयी तसेच तो सोहळ्याप्रमाणे साजरा करण्याची गरजही यानिमित्ताने अधोरेखित केली गेली. यावेळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कलाकृतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेने या सोहळ्यात आनंद आणि प्रोत्साहनाची भर टाकली.
4BE8.jpeg)
जग उद्या जागतिक वारसा दिन साजरा करण्याच्या तयारी करत आहे, अशावेळी या सोहळ्याचे आयोजन करून भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने वारसा हा केवळ इमारतींमध्येच नव्हे, तर लोकांच्या हृदयात आणि अभिव्यक्तीमधून जिवंत राहात असतो याचीच प्रचिती दिली आहे.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2122579)
आगंतुक पटल : 30
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English