अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई सीमाशुल्क विभागाच्या कारवाईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावर परदेशी प्रवाशाकडून 7.85 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

Posted On: 14 APR 2025 1:29PM by PIB Mumbai

 

सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळावर 910 एप्रिल 2025 रोजी 785 ग्रॅम वजनाचे व सुमारे 7.85 कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले असून यासंदर्भात एका परदेशी प्रवाशाला अटक केली आहे. यासंदर्भात  गुन्हा नोंदवण्यात आला  आहे.

9 एप्रिल 2025 रोजी यूआर430 या विमानाने प्रवास करुन मुंबईत आलेल्या एका परदेशी प्रवाशाला सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी संशयावरुन रोखले होते. चौकशी करताना हा प्रवासी अस्वस्थ व चिंतीत झाल्याचे जाणवले. पुढील चौकशीत व वैद्यकीय तपासणीत प्रवाशाने पिवळ्या रंगाच्या भरपूर गोळ्या गिळल्याचे आढळून आले. या गोळ्यांमध्ये कोकेन असल्याचा संशय असलेला पांढऱ्या रंगाचा चुरगाळलेला पदार्थ होता. 

वैद्यकीय देखरेखीअंतर्गत 13 एप्रिल 2025 रोजी केलेल्या पंचनाम्यात हा पदार्थ 785 ग्रॅम वजनाचे कोकेन असल्याचे सीमाशुल्क अधिकाऱ्यांना आढळले. त्याची अंदाजे किंमत 7,85,00,000 रुपये इतकी आहे.  या प्रवाशाला एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत अटक करण्यात आली असून  पुढील तपास सुरू आहे.

***

N.Chitale/S.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2121593)
Read this release in: English