अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नागपूरच्या राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी- एनएडीटीमध्ये आयआरएसच्या 77 व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा  सेवापुर्व प्रशिक्षणाचा समारोप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार

Posted On: 13 APR 2025 6:31PM by PIB Mumbai

नागपूर 13 एप्रिल 2025

नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी एनएडीटीमध्ये भारतीय महसूल सेवा - आय आर एस च्या 77 व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचा  सेवापुर्व प्रशिक्षणाचा समारोप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी  यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्या १४ एप्रिल  सोमवार रोजी सकाळी १० वाजता   अकादमीच्या रंगशाला सभागृहात होणार आहे. या प्रसंगी  केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ सीबीडीटीचे सदस्य   प्रबोध सेठ,   प्रधान  महासंचालक   संजय बहादूर हे सन्माननीय  अतिथी म्हणून उपस्थित राहतील. रॉयल भूतान सेवेच्या 2 अधिकाऱ्यांसह 84 आयआरएस अधिकारी प्रशिक्षणार्थींनी 16 महिन्यांचे सेवा पूर्व प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

नागपूर येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी   ही  केंद्र शासनाच्या भारतीय महसूल सेवा (आयकर)  अधिकाऱ्यांसाठी सर्वोच्च प्रशिक्षण संस्था आहे. आयआरएस अधिकाऱ्यांची भरती केंद्रीय लोकसेवा आयोग  द्वारे आयोजित नागरी सेवा परीक्षा  द्वारे केली जाते.   प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, अधिकारी प्रशिक्षणार्थींना   प्राप्तिकर सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्त केले जाते.

तब्बल 16 महिने चालणारे हे सेवापूर्व प्रशिक्षण  नियोजित अभ्यासक्रमाद्वारे, या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना  त्यांच्या भूमिकांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आणि राष्ट्राच्या विकासात प्रभावीपणे योगदान देण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्ये आणि मानसिकता प्रदान करतो.सदर  प्रशिक्षण "विकसित भारत" या संकल्पनेवर आधारित आहे, जी भारताच्या माननीय पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे, जी अधिकाऱ्यांमध्ये उत्कृष्टता, जबाबदारी आणि नाविन्यपूर्णतेची संस्कृती वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. या कार्यक्रमात  अभ्यास सत्र,   केस स्टडीज आणि परस्परसंवादी चर्चा यांचा समावेश होता, ज्यामध्ये कर प्रशासन, नेतृत्व आणि सार्वजनिक सेवेच्या विविध पैलूंचा समावेश होता.

***

D.Wankhede/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2121458) अभ्यागत कक्ष : 54
Read this releasein: English