ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
इंडिया जेम अँड ज्वेलरी शो चे मुंबईत आयोजन
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न
प्रविष्टि तिथि:
05 APR 2025 7:57PM by PIB Mumbai
केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज मुंबईत अखिल भारतीय रत्ने आणि आभूषणे परिषदद्वारे (जीजेसी) आयोजित इंडिया जेम अँड ज्वेलरी शो (जीजेएस) 2025 ला संबोधित केले. परिषदेचे अध्यक्ष राजेश रोकडे, उपाध्यक्ष अविनाश गुप्ता या प्रसंगी पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उद्योगाप्रती जीजेएसच्या वचनबद्धतेचे कौतुक करताना, जोशी यांनी अधोरेखित केले की देशांतर्गत दागिने क्षेत्राचे "संरक्षण, प्रोत्साहन आणि प्रगती" हे परिषदेचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुरूप आहे. त्यांनी भारताच्या रत्न आणि आभूषण क्षेत्राचे ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले, जे जीडीपीमध्ये अंदाजे 7% योगदान देते आणि सुमारे 50 लाख लोकांना रोजगार प्रदान करते.
मंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे :
आर्थिक वर्ष 2023–24 मध्ये, भारताची रत्ने आणि आभूषण निर्यात 22 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी राहिली जी 2027 पर्यंत 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
भारत हा हिऱ्यांचा आघाडीचा जागतिक निर्यातदार आणि सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे.
गुणवत्ता, मानकीकरण आणि ग्राहक संरक्षण यावर लक्ष केंद्रित करून जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.
भारतीय मानक ब्युरो (बीआयएस ) ने अनेक प्रमुख उपक्रम राबविले आहेत:
361 जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग अनिवार्य
हॉलमार्किंग नोंदणींमध्ये सुमारे 2 लाख जवाहिऱ्यांची वाढ
असेयिंग आणि हॉलमार्किंग केंद्रांची संख्या 331 (2014–15) वरून 1623 (2025) पर्यंत वाढ
एक्सआरएफ मशीन आणि लेसर सिस्टीमच्या एकत्रीकरणासह हॉलमार्किंग प्रक्रियांचे डिजिटल ऑटोमेशन
आजपर्यंत 44 कोटींहून अधिक सोन्याच्या वस्तूंचे हॉलमार्क झाले आहे
केंद्रीय मंत्र्यांनी इंटर्नशिप कार्यक्रम, कौशल्य विकास अभ्यासक्रम आणि बीआयएस प्रयोगशाळांना भेटीसह कौशल्य विकासाला बळकटी देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर भर दिला.
सोन्याच्या दागिन्यांसाठी अभिनव नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग (एनडीटी) तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी त्यांनी जीजेसीच्या सहकार्याने राष्ट्रीय हॅकेथॉन सुरू करण्याची घोषणा केली.
तसेच सरकारने जगभरात उद्योगाचा विस्तार करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत:
स्वयंचलित मार्गाने या क्षेत्रात 100% एफडीआयला परवानगी
निर्यात वाढविण्यासाठी विविध मुक्त व्यापार करार (एफटीए)
मुंबईत सिप्झ सेझ येथे भारतरत्नम मेगा कॉमन फॅसिलिटेशन सेंटर चे उद्घाटन
जोशी यांनी उद्योगांना शाश्वत पद्धती, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आणि जागतिक बाजारपेठेला आकर्षित करण्यासाठी 'ब्रँड इंडिया' वर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, केंद्रीय मंत्र्यांनी रत्ने आणि आभूषणे क्षेत्राप्रति सरकारच्या अतूट पाठिंब्याचा पुनरुच्चार केला आणि जीजेएस 2025 च्या यशस्वी आयोजनासाठी जीजेसीचे अभिनंदन केले.
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2119392)
आगंतुक पटल : 38
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English