सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सहकारी संस्थांसाठी बीएफएसआय कौशल्यांची कमतरता भरून काढण्याकरिता 'भारत-बँकर' कार्यक्रम सुरू करण्यासाठी व्हॅम्निकॉम आणि सिंजेंटा फाउंडेशनचा सहयोग

Posted On: 04 APR 2025 4:23PM by PIB Mumbai

 

पुणे : एप्रिल 4, 2025

ग्रामीण तरुणांना सक्षम बनवण्यासाठी आणि भारताच्या ग्रामीण बँकिंग आणि सहकारी परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत, पुण्याच्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेने (VAMNICOM),  देशभरात "भारत-बँकर" कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात आणि अंमलबजावणी करण्यासाठी सिंजेंटा फाउंडेशन इंडिया सोबत एक ऐतिहासिक भागीदारी केली आहे.

दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी सिंजेंटा फाउंडेशनचे भारतातील संचालक, सिंजेंटा फाउंडेशन इंडिया टीमचे वरिष्ठ अधिकारीव्हॅम्निकॉमचे संचालक आणि संस्थेच्या प्रतिष्ठित प्राध्यापकांच्या उपस्थितीत, पुण्यातील व्हॅम्निकॉममध्ये सामंजस्य करारावर अधिकृतपणे स्वाक्षरी करण्यात आली. हा कार्यक्रम 2025 च्या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने सुरू असलेल्या उत्सवाशी सुसंगत असून यामुळे  ग्रामीण भारतातील सहकार-नेतृत्वाखालील परिवर्तनावर लक्ष केंद्रित केलेल्या या सहयोगी प्रयत्नांना प्रतीकात्मक मूल्य मिळाले.

"भारत-बँकर" कार्यक्रम हा भारतातील 25,000 ग्रामीण तरुणांना बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (बीएफएसआय) क्षेत्रातील मुख्य क्षमता आणि रोजगारक्षम कौशल्यांसह सक्षम करण्यासाठी आखलेला  एक अग्रगण्य उपक्रम आहे. हा कार्यक्रम सहकार मंत्रालयाच्या पथदर्शी उद्दिष्टांमध्ये थेट योगदान देतो, विशेषतः प्राथमिक कृषी पत संस्था PACS चे संगणकीकरण, PACS चे कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs) मध्ये रूपांतर आणि शाश्वत ग्रामीण विकास सुनिश्चित करण्यासाठी सहकारी कर्मचाऱ्यांची क्षमता निर्माण करणे यात अभिप्रेत आहे.

ग्रामीण युवा सक्षमीकरण आणि सहकारी विकासासाठी सामायिक बांधिलकी या सामंजस्य करारावरील स्वाक्षरी सोहोळ्यातून प्रतीत होते. यावेळी, सिंजेंटा फाउंडेशन इंडियाचे भारतातील संचालक राजेंद्र जोग म्हणाले,

"ही भागीदारी ग्रामीण भारतातील हजारो तरुणांना उद्योग-संबंधित कौशल्यांनी सुसज्ज करून सक्षम करेल, ज्यामुळे ते सहकारी आणि वित्तीय क्षेत्रात अर्थपूर्ण योगदान देऊ शकतील."

व्हॅम्निकॉमच्या संचालक डॉ. हेमा यादव यांनी सहकार्याच्या परिवर्तनीय स्वरूपावर भर देत म्हटले की,

"भारत-बँकर कार्यक्रम सहकारी संस्थांच्या सक्षमीकरणाच्या भावनेला मूर्त रूप देतो. क्षमता बांधणीला वास्तविक जगाच्या अनुभवाशी जोडून, आम्ही सहकारी चळवळ आणि ग्रामीण बँकिंग परिसंस्थेसाठी एक मजबूत, कुशल कार्यबल तयार करत आहोत."

Please find copy of MoU between Syngenta Foundation & VAMNICOM here

***

S.Kakade/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119086) Visitor Counter : 33


Read this release in: English