रेल्वे मंत्रालय
इंदूर - पुणे - इंदूर विशेष गाडीच्या प्रवासाचा कालावधी वाढवण्यात आला
Posted On:
25 MAR 2025 4:15PM by PIB Mumbai
पुणे, 25 मार्च 2025
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने पुणे आणि इंदूर दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीच्या प्रवासाचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे:
1. इंदूर - पुणे साप्ताहिक विशेष (14 फेऱ्या)
गाडी क्रमांक 09324 इंदूर - पुणे साप्ताहिक विशेष, जी पूर्वी 19.03.2025 पर्यंत चालविण्यात येणार होती, ती आता 26.03.2025 ते 25.06.2025 या कालावधीसाठी वाढविण्यात आली आहे.
2. पुणे - इंदूर साप्ताहिक विशेष (14 फेऱ्या)
गाडी क्रमांक 09323 पुणे - इंदूर साप्ताहिक विशेष, जी पूर्वी 20.03.2025 पर्यंत चालविण्यात येणार होती, ती आता 27.03.2025 ते 26.06.2025 या कालावधीसाठी वाढविण्यात आली आहे.
गाडीच्या प्रवासनाच्या दिवशी, वेळ, डब्यांची रचना आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल नाही.
आरक्षण:
विशेष गाडी 09323/09324 च्या विस्तारित फेऱ्यांसाठी 26.03.2025 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर तिकिट आरक्षण सुरू होईल.
गाडीच्या थांबे व वेळेत विस्तृत माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.
S.Pophale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2114857)