वस्त्रोद्योग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक ब्रँड्ससाठी भारताला पसंतीचा कापूस पुरवठादार बनवण्याचे सरकारी उपक्रमांचे उद्दिष्ट


वर्ष 2024-25 साठी कापूस ताळेबंद प्रसिद्ध: वस्त्रोद्योगासाठी पुरेसा पुरवठा सुनिश्चित

सीओसीपीसी बैठकीत 2024-25 वर्षासाठी कापसाचा पुरवठा, मागणी आणि निर्यात कल यांचा घेण्यात आला आढावा

Posted On: 24 MAR 2025 9:20PM by PIB Mumbai

 

मुंबई, 24 मार्च 2025

 

"प्रति एकर उत्पादन वाढवणे आणि प्रक्रिया गुणवत्ता सुधारणे हे आमचे ध्येय आहे जेणेकरून भारतातून मूल्य साखळीच्या कोणत्याही टप्प्यावर कापूस खरेदी करणारे आंतरराष्ट्रीय ब्रँड कायमस्वरूपी खरेदीदार बनतील." भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वस्त्रोद्योग आयुक्त  रूप राशी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी कापूस क्षेत्रातील प्रमुख घडामोडींचा उल्लेख केला आणि उत्पादकता व गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने कापूस उत्पादन, व्यापार आणि उपक्रमांबाबत अभ्यासपूर्ण  माहिती सामायिक केली.

कापूस हंगाम 2024-25 साठी आज वस्त्रोद्योग आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कापूस उत्पादन आणि उपभोग समिती (सीओसीपीसी) ची दुसरी बैठक पार पाडली , त्यानंतर पत्रकार परिषद झाली. या बैठकीत केंद्र सरकार, राज्य सरकारे, वस्त्रोद्योग, कापूस व्यापार आणि जिनिंग आणि प्रेसिंग क्षेत्राचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

माध्यमांशी संवाद साधताना, वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी यांनी वस्त्रोद्योग क्षेत्रावर सरकार सातत्याने देत असलेला भर अधोरेखित केला. त्या म्हणाल्या : "आपल्या सर्वांना माहित आहे की, केंद्र सरकारसाठी विकासाच्या दृष्टीने  वस्त्रोद्योग हे एक प्रमुख क्षेत्र  आहे. या संदर्भात, या क्षेत्रातील वाढ आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कापूस तंत्रज्ञान अभियानाची घोषणा करण्यात आली आहे."

एक प्रमुख फायबर आणि कापड मूल्य साखळीत महत्त्वाचे योगदान देणारा घटक म्हणून त्यांनी कापसाचे महत्त्व अधोरेखित केले. हितधारकांच्या सहकार्याने क्षेत्रीय कार्यालय स्तरावर सातत्याने  मूल्यांकन केल्याने उद्योगाची ताकद आणि उदयोन्मुख गरजा प्रभावीपणे पूर्ण होतील हे सुनिश्चित होते.

वस्त्रोद्योग आयुक्तांनी विश्वास व्यक्त केला की  उत्पादकता आणि गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून सर्व संबंधितांसाठी  कापड मूल्य साखळी यापुढेही मजबूत परतावा देत राहील.  कापसाची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी प्रमुख उपक्रम अधोरेखित केले , ते पुढीलप्रमाणे आहेत :

✅भारतातील कापसाला जागतिक स्तरावरील उच्च गुणवत्तेचे उत्पादन म्हणून स्थापित करण्यासाठी "कस्तुरी" अंतर्गत ब्रँडिंग.

✅ उत्कृष्ट फायबर गुणवत्ता राखण्यासाठी सुधारित जिनिंग प्रक्रिया.

✅ एचडीपीएस (उच्च-घनता लागवड प्रणाली) आणि प्रगत शेती तंत्रांद्वारे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी मंत्रालयाबरोबर सहकार्य.

भारतीय कापूस महामंडळाचे  अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, ललित कुमार गुप्ता यांनी केंद्र सरकारने  उत्पादनवाढीसाठी हाती घेतलेल्या  विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. त्यांनी 'अकोला मॉडेल' विषयी सांगितले की, हे मॉडेल उच्च उत्पादनासाठी आधुनिक आणि प्रभावी शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देते.  

"या मॉडेलच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी उच्च गुणवत्तेच्या बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. हा उपक्रम सध्या अकोल्यामध्ये प्रायोगिक स्तरावर राबवला जात आहे. जर हा प्रयोग यशस्वी ठरला, तर तो देशभरातील शेतकऱ्यांसाठी लागू करता येईल, ज्यामुळे एकूणच कापूस उत्पादन वाढण्यास मदत होईल," असे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमाला कृषी मंत्रालय, नाबार्ड आणि राज्य सरकारच्या विविध संस्थांचे सहकार्य लाभत आहे.
 
या वार्ताहर  परिषदेस मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालयाचे संचालक सौरभ कुलकर्णी देखील उपस्थित होते.
 
बैठकीत कापसाच्या उत्पादनस्थितीचे सखोल मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये राज्यनिहाय क्षेत्रफळ, उत्पादन, आयात, निर्यात आणि वापराचा कल यांचा  समावेश होता. सध्याच्या उत्पादन, आयात आणि निर्यात स्थितीचा आढावा घेतल्यानंतर समितीने असा निष्कर्ष काढला की आगामी हंगामात वस्त्रोद्योगासाठी भारताकडे कच्च्या मालाच्या स्वरूपात पुरेसा कापूस उपलब्ध असेल. 
 
समितीने कापूस उत्पादन आणि वापराच्या आधारे राज्यनिहाय क्षेत्रफळ, उत्पादन आणि संपूर्ण ताळेबंद प्रसिद्ध केला.  
 
कापूस हंगाम 2023-24 आणि 2024-25 साठी 24.03.2025 रोजी प्रसिद्ध ताळेबंद पुढीलप्रमाणे आहे:  

Particulars

2023-24 (P)

2024-25 (P)

(In lakh bales of 170 kg. Each)

(in Thousand Tons)

(In lakh bales of 170 kg. Each)

(in Thousand Tons)

SUPPLY

 

 

 

 

Opening Stock

61.16

1039.72

47.10

800.70

Crop

325.22

5528.74

294.25

5002.25

Import

15.20

258.40

25.00

425.00

TOTAL SUPPLY

401.58

6826.86

366.35

6227.95

DEMAND

 

 

 

 

Non-MSME Consumption

214.83

3652.11

210.00

3570.00

MSME Consumption

95.29

1619.93

92.00

1564.00

Non Textile Consumption

16.00

272.00

16.00

272.00

Export

28.36

482.12

18.00

306.00

TOTAL DEMAND

354.48

6026.16

336.00

5712.00

Closing Stock

47.10

800.70

30.35

515.95

P-Provisional

 

 
 
 
 
S.Kakade/S.Kane/G.Deoda/P.Malandkar
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 
 

(Release ID: 2114625)
Read this release in: English