रेल्वे मंत्रालय
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धा 2025 ला सुरुवात
Posted On:
21 MAR 2025 7:20PM by PIB Mumbai
पुणे, 21 मार्च 2025
पुणे विभाग, मध्य रेल्वेने ताडीवाला रोड स्पोर्ट्स ग्राऊंडवर आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धा 2025 चे आयोजन केले आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सांघिक कार्य, खिलाडूवृत्ती आणि सौहार्दाची भावना वाढीस लागण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन आज विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा सहा दिवस चालणार आहे.
या स्पर्धेत पुणे विभागातील 15 विभागांचे एकूण 28 सामने खेळवले जाणार आहेत. उद्घाटनाच्या सामन्यात इलेक्ट्रिकल विभाग आणि स्टोअर्स विभाग यांच्यात जोरदार सामना झाला.
31 मार्च 2025 रोजी उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी होईल, जिथे अव्वल संघ विजेतेपदासाठी स्पर्धा करतील.

* * *
PIB Pune | S.Nilkanth/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113824)
Visitor Counter : 27