ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
ग्राहक जागरुकता आणि मानकांच्या दृढ अनुपालनासाठी (बीआयएस) भारतीय मानक ब्युरो मुंबई शाखा कार्यालय II ने ‘क्वालिटी कनेक्ट’मोहिमेची केली सुरुवात
Posted On:
14 MAR 2025 9:25PM by PIB Mumbai
मुंबई, 14 मार्च 2025
ग्राहक जागरुकता वृद्धींगत करण्यासाठी आणि गुणवत्ता मानकांच्या अनुपालनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) मुंबई शाखा कार्यालय II ने ‘क्वालिटी कनेक्ट’(गुणवत्ता मोहीम 7.0) मोहिमेचा प्रारंभ केला आहे. 11 मार्च ते 20 मार्च 2025 या कालावधीत हा उपक्रम सुरू राहाणार असून, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातल्या सरकारी विभागांना भारतीय मानक ब्युरो मानके आणि आणि प्रमाणीकरण याविषीय शिक्षित करण्याचे या उपक्रमाचे लक्ष्य आहे.
15 मार्च 2025 रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो त्यामुळे या मोहिमेला विशेष महत्त्व आहे. या वर्षीची संकल्पना, माहितीपूर्ण निवडीद्वारे ग्राहक सक्षमीकरणावर भर देणारी असून ग्राहक हित संरक्षणासाठी गुणवत्तेची हमी आणि नियामक अनुपालनाची महत्त्वाची भूमिका अधोरेखित होते.
‘क्वालिटी कनेक्ट’द्वारे, मानक मित्र आणि संसाधन /स्रोत व्यक्ती यांच्यासह बीआयएस तज्ज्ञ भारतीय मानकांबद्दलची त्यांची समज वृद्धींगत कऱण्यासाठी आणि प्रमाणित उत्पादनांच्या अंमलबजावणीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सरकारी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. खरेदी धोरणे आणि नियामक अंमलबजावणीवर प्रभाव पाडण्यात सरकारी कार्यालये महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे ग्राहक संरक्षण आणि राष्ट्रीय आर्थिक वृद्धीसाठी गुणवत्ता मापदंडाविषयी त्यांची सजगता गरजेची असते.

या उपक्रमाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बीआयएस केअर अॅपची प्रसिद्धी करणे. हे एक डिजीटल टूल आहे जे ग्राहकांना बीआयएस-प्रमाणित उत्पादनांची सत्यता पडताळण्यास मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या अॅपमुळे आयएसआय चिन्हांकीत आणि हॉलमार्क प्रमाणित उत्पादनांची वैधता तपासण्यासाठी, तक्रार दाखल करण्यासाठी आणि भारतीय मानकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी ग्राहकाला सक्षम करण्यास मदत करते. अधिकाऱ्यांना या अॅपची ओळख करुन देऊन, गुणवत्ता प्रमाणित वस्तूंचा व्यापक स्वीकार करण्यासाठी आणि ग्राहकाचा विश्वास वृद्धींगत करण्यासाठी या अॅपचा अधिकाऱ्यांना परिचय करून देण्याचा बीआयएसचा उद्देश आहे.
बीआयएस प्रमाणनाच्या फायद्यांविषयी व्यापक माहिती देण्यासाठी, या मोहिमेदरम्यान, माहितीपत्रके आणि पुस्तिका यांसह साहाय्य करणाऱ्या साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे. गुणवत्ता सजगतेची संस्कृती वाढवणे, सरकारी कार्यालयांनी त्यांच्या खरेदी प्रक्रियेत प्रमाणित उत्पादनांना प्राधान्य देत उद्योग आणि जनतेसाठी आदर्श म्हणून काम करावे यासाठी प्रोत्साहित करणे हा देखील मोहिमेचा उद्देश आहे.
जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या निमित्ताने, बीआयएस मुंबई शाखा कार्यालय II ने,जिल्ह्यांमध्ये नियुक्त अधिकाऱ्यांना या मोहिमेत सक्रीय सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ही मोहीम केवळ उत्पादन सुरक्षिततेचे महत्त्व आणि नियामक पालनाचे महत्त्व अधोरेखित करत नाही तर मानकीकरण आणि गुणवत्ता हमीद्वारे ग्राहक सक्षमीकरणाच्या व्यापक ध्येयात देखील योगदान देत आहे.
बाजारात उपलब्ध उत्पादने कठोर सुरक्षा आणि गुणवत्ता मानकांचे पालन करतात याची सुनिश्चिती करत बीआयएस ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण जारी राखते. भारताला गुणवत्ता-सजग राष्ट्र बनवण्याच्या दिशेने हे प्रयत्न आणखी एक पाऊल पुढे टाकत आहेत, ज्यामुळे माहिती संपन्न ग्राहक आणि आणि दायीत्वपूर्ण प्रशासन, उत्पादन सुरक्षा आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी हातात हात घालून एकत्र काम करतील.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/V.Salvi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2111444)
अभ्यागत कक्ष : 66