दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
पोस्टमास्तर जनरल, गोवा विभाग यांच्या वतीने 20 मार्च रोजी 61 व्या प्रादेशिक स्तरावरील डाक अदालतीचे आयोजन
गोवा विभागातील टपाल सेवांबाबतच्या तक्रारी न्यायालयामध्ये सोडवल्या जातील
Posted On:
10 MAR 2025 12:11PM by PIB Mumbai
पणजी, गोवा, 10.03.2025
61वी प्रादेशिक स्तरावरील डाक अदालत पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, पणजी येथे दिनांक 20 मार्च 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता आयोजित केली आहे. गोवा विभागातील गेल्या सहा आठवड्यांतील निराकरण न झालेल्या टपालसेवांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करणे आणि त्या सोडविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
मेल्स, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, बचत बँका आणि मनीऑर्डरद्वारे पैसे न पोहोचणे या तक्रारींवर डाक अदालत लक्ष केंद्रित करेल. यासंदर्भात तक्रारी असलेल्या ग्राहकांनी त्यांच्या तक्रारी सहाय्यक संचालक पोस्टल सर्व्हिसेस-1, पोस्टमास्टर जनरल कार्यालय, गोवा क्षेत्र, पणजी 403001 येथे नक्कल प्रतीसह कराव्यात. ज्या अधिकाऱ्यांकडे मूळ तक्रार संबोधित केली गेली होती, त्यांच्या तारखा, नावे आणि पदनाम, तसेच समस्यांचे संक्षिप्त वर्णन, यांच्या विशिष्ट तपशीलांचा तक्रारींमध्ये समावेश असावा.
तक्रारी सादर करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 आहे.
शक्य तितकी सर्वोत्तम सेवा प्रदान करण्याचा प्रयत्न करत असताना, संवादातील अंतर आणि सेवा दोष अधूनमधून उद्भवतात, ज्यामुळे तक्रारी उद्भवू शकतात, हे टपाल विभागाला मान्य आहे. संबंधित ग्राहकांना भेटण्यासाठी, त्यांच्या तक्रारींचा तपशील गोळा करण्यासाठी आणि शक्य तितक्या लवकर त्यांचे निराकरण करण्यासाठी विभागाने या डाकअदालतींचे आयोजन केले आहे.
अशा कार्यक्रमांचे आयोजन करून, ग्राहकांना असलेल्या समस्यांकडे विभाग काळजीपूर्वक लक्ष देत असतो आणि त्यांचे समाधान सुनिश्चित करणे याला टपाल विभाग सर्वोच्च प्राधान्य देत असतो.
***
SonalT/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2109806)
अभ्यागत कक्ष : 54