सांस्कृतिक मंत्रालय
भाषा हे माणुसकी समजून घेण्यासाठीचे पारपत्र आहे- युनेस्कोच्या दक्षिण आशिया प्रादेशिक कार्यालयाचे संचालक आणि प्रतिनिधी टिम कर्टिस
Posted On:
21 FEB 2025 9:00PM by PIB Mumbai
इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राने (आयजीएनसीए) आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यासाठी 21 आणि 22 फेब्रुवारी 2025 या दोन दिवशी विशेष सोहोळ्याचे आयोजन केले आहे. ‘शाश्वत विकासासाठी भाषेला जमेत धरा’ या संकल्पनेवर केंद्रित असलेल्या या कार्यक्रमाने शाश्वत विकासाची जोपासना करण्यात भाषेच्या भूमिकेवर चर्चा करण्यासाठी सुप्रसिध्द विचारवंत, भाषातज्ञ आणि सांस्कृतिक तज्ञांना एकत्र आणले. 21 फेब्रुवारीला झालेल्या उद्घाटनपर सत्रात ‘भारतीय सुलेखन कला: राजीव कुमार यांच्या कलाकृतींच्या माध्यमातून प्राचीन विद्वत्तेचे दर्शन’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच आशना आणि रितू माथुर यांनी संशोधित केलेल्या ‘भाषारीती’ या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युनेस्कोच्या दक्षिण आशियासाठीच्या प्रादेशिक कार्यालयाचे संचालक आणि प्रतिनिधी टिम कर्टिस तर विशेष अतिथी म्हणून केंद्रीय संस्कृती मंत्रालयाच्या संयुक्त सचिव लिली पांडेय उपस्थित होत्या. या कार्यक्रमाने अभ्यासपूर्ण चर्चांसाठी गतिशील मंच उपलब्ध करुन देऊन, भाषिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याप्रती सामुहिक बांधिलकीचे सशक्तीकरण केले.

(L-R) Ms. Ashna , Ms. Ritu Mathur, Prof. Ramesh Chandra Gaur, Dr. Sachchidanand Joshi , Mr. TIm Curtis. Prof. Shobhana Chelliah, Prof. Sadaf Munshi Launching the book at the Event

Mr. Tim Curtis and Prof. Ramesh Chandra Gaur walking through the Exhibition
उपस्थितांना संबोधित करताना टिम कर्टिस म्हणाले की आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आपले विचार आणि शब्दांना घडवणाऱ्या भाषेचा सन्मान करत असल्यामुळे हा दिवस अत्यंत वैयक्तिक आणि सार्वत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. केवळ संवादाचे साधन न राहता, भाषा प्रत्येकाची ओळख निश्चित करते आणि व्यक्तींना त्यांच्या इतिहासाशी तसेच समुदायाशी जोडते. दक्षिण आशियाच्या समृध्द भाषिक परिदृष्याचा ठळक उल्लेख करत त्यांनी सांगितले की संशोधनातून असे दिसून आले आहे की सध्या 7,000 हून अधिक भाषांचे अस्तित्व धोक्यात आहे आणि त्यात स्वदेशी भाषा अधिक असुरक्षित असल्याने त्यांना अधिक धोका आहे.
भाषा हे केवळ संवादाचे साधन नसून एका अर्थी ते माणुसकी समजून घेण्यासाठीचे पारपत्र आहे असे सांगून टिम कर्टिस यांनी भाषणाचा समारोप केला.
***
N.Chitale/S.Chitnis/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2105430)
Visitor Counter : 22