भूविज्ञान मंत्रालय
वातावरण, हवामान आणि महासागर यामध्ये मशीन लर्निंग संदर्भात भारत-इटली दरम्यान सहकार्य
Posted On:
12 FEB 2025 10:06PM by PIB Mumbai
पुणे, 12 फेब्रुवारी 2025
कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) हवामान अनुकूल अनुसरण आणि संशोधनात प्रगतीसाठी, भाकित क्षमता सुधारण्यासाठी आणि हवामान लवचिकतेत नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याकरिता भारत आणि इटलीच्या आघाडीच्या शास्त्रज्ञांची पुण्यात बैठक झाली. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि युरो-भूमध्य हवामान केंद्र (सीएमसीसी) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या कार्यशाळेचे उद्दिष्ट हवामान संशोधन आणि मशीन लर्निंग अनुप्रयोगांमध्ये संशोधन संस्था आणि जागतिक अग्रणीं मधील सहकार्य मजबूत करणे हे आहे.

पुणे येथे आयोजित वातावरण, हवामान आणि महासागरातील मशीन लर्निंगवरील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेने हवामान विज्ञान, हवामानशास्त्र आणि समुद्रशास्त्रात मशीन लर्निंग (एमएल) लागू करण्यासाठी सहकार्य मजबूत करण्याकरिता दोन्ही देशांतील आघाडीच्या शास्त्रज्ञांना एकत्र आणले आहे. युरो-भूमध्य हवामान केंद्र (सीएमसीसी) आणि भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेद्वारे (आयआयटीएम) आयोजित या कार्यक्रमात फोंडाझिओन ब्रुनो केसलर (एफबीके) आणि इटालियन नॅशनल सेंटर फॉर रिसर्च (सीएनआर) चे शास्त्रज्ञ देखील सहभागी झाले. हवामान आणि वातावरणाबाबत अंदाज क्षमता सुधारण्याकरिता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन विकसित करण्यात इटली आणि भारत यांच्यातील आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना देण्यासाठी ही कार्यशाळा एक मैलाचा दगड ठरेल.
एआय द्वारे हवामान शास्त्राची प्रगती
इटली आणि भारत दोघांनीही हवामान संशोधन आणि एमएल अनुप्रयोगांमध्ये जागतिक अग्रणी म्हणून स्वतःला प्रस्थापित केले आहे.
एमएल, वातावरण शास्त्र आणि समुद्रशास्त्रातील तज्ञांमध्ये ज्ञानाची देवाणघेवाण आणि नेटवर्किंग सुलभ करणे हे या कार्यशाळेचे उद्दिष्ट आहे. एमएल द्वारे हवामान अनुकूल अनुसरण, हवामान अंदाज प्रणाली आणि महासागर निरीक्षण साधने लक्षणीयरीत्या सुधारू शकणाऱ्या प्रमुख क्षेत्रांची ओळख देखील यात केली जाईल; सहयोगी संशोधन प्रकल्प सुरू केले जातील आणि इटली आणि भारत यांच्यात संस्थात्मक भागीदारी वाढवली जाईल; आणि एआय-चालित हवामान संशोधनात डेटा सामायिकीकरण, अनुसरण व्याख्या आणि नैतिक विचारांशी संबंधित आव्हानांना तोंड देईल.
हवामान अनुकूल अनुसरण आणि संशोधनात नावीन्य आणण्यासाठी प्रमुख क्षेत्रे-
एक प्रमुख चर्चेचे क्षेत्र म्हणजे हवामान अनुकूल अनुसरण आणि अंदाज. आणखी एक महत्त्वाचा विषय हवामान आणि मान्सून अंदाज
आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करणे
संयुक्त कार्यगटांची स्थापना, डेटा आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक चौकट विकसित करणे आणि हवामान विज्ञानात मशीन लर्निंगची भूमिका स्पष्ट करणारे श्वेतपत्र काढणे यासारख्या इटली-भारत दरम्यानच्या भविष्यातील सहकार्यासाठी या कार्यशाळेमुळे मार्ग प्रशस्त होईल. याव्यतिरिक्त, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी देवाणघेवाण कार्यक्रम तसेच संयुक्त निधी प्रस्ताव हे देखील चर्चेचा भाग आहेत.
येत्या काही वर्षांत आमच्या इटालियन सहकाऱ्यांसोबत उत्पादक संशोधन भागीदारीची मी अपेक्षा करतो असे डॉ. आर. कृष्णन, संचालक, आयआयटीएम म्हणाले.
"ही कार्यशाळा भारतीय उपखंडात वातावरण आणि हवामानाचा अंदाज सुधारू आणि वाढवू शकणाऱ्या एआय/एमएल तंत्रांचा शोध घेण्याच्या दिशेने एक पाऊल होते" असे डॉ. स्वप्ना पानिकल, उपप्रकल्प संचालक - क्लायमेट मॉडेलिंग, सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्च (सीसीसीआर)-आयआयटीएम यांनी सांगितले.

सीएमसीसीचे संचालक प्रो. अँटोनियो नवारा यांनी मी आमच्या भारतीय सहकाऱ्यांसोबत एक मजबूत भागीदारी निर्माण करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2102539)
Visitor Counter : 24