माहिती आणि प्रसारण मंत्रालय
श्रीलंका आणि एन एफ डी सी चित्रपट महोत्सवासह 5व्या एन एफ डी सी आणि कंट्री फिल्म फेस्टिव्हलला एनएमआयसी येथे प्रारंभ
Posted On:
02 FEB 2025 2:43PM by PIB Mumbai
मुंबई, 2 फेब्रुवारी 2025
राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळा अंतर्गत (एनएफडीसी) भारतीय चित्रपट राष्ट्रीय संग्रहालय (एनएमआयसी) ने श्रीलंका आणि एन एफ डी सी चित्रपट महोत्सवासह एन एफ डी सी आणि कंट्री फिल्म फेस्टिव्हलच्या 5 व्या आवृत्तीचे 1 फेब्रुवारी 2025 रोजी यशस्वीरित्या उद्घाटन केले. 1 ते 5 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणारी ही पाच दिवसीय सिनेमॅटिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण, भारत आणि श्रीलंकेतील कथाकथन परंपरा साजरी करीत आहे.

संग्रहालयाच्या फेरफटकाने महोत्सवाची सुरुवात झाली आणि त्यानंतर एन एम आय सी -एन एफ डी सी च्या व्यवस्थापक जयिता घोष यांनी उद्घाटनपर भाषणात सिनेमाद्वारे परस्पर-सांस्कृतिक सहकार्याचे महत्त्व अधोरेखित केले . कार्यक्रमादरम्यान, एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन यांनी श्रीलंका पर्यटन प्रोत्साहन विभागाचे अध्यक्ष बुद्धिका हेवावासम आणि श्रीलंकेच्या कार्यवाहू महावाणिज्य दूत शिरानी अरियारत्ने यांचा सत्कार केला. यानंतर, श्रीलंकेच्या शिष्टमंडळाने एनएफडीसीला दोन्ही राष्ट्रांमधील चित्रपट विषयक संबंध मजबूत करण्यासाठी सतत पाठिंबा दिल्याबद्दल सन्मानित केले.
या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री तरनजीत कौर यांना हेवावासम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राजू या स्टुडंट अकादमी पुरस्कार विजेत्या लघुपटातील त्यांच्या अप्रतिम भूमिकेसाठी, तसेच आँखो देखी आणि एअरलिफ्टमधील मधील भूमिकांमुळे सर्वांना परिचित असलेल्या तरनजीत यांनी अशा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक देवाणघेवाणीचा भाग बनता आल्याबद्दल कृतज्ञता आणि आनंद व्यक्त केला.
"यासारखे महोत्सव सृजनशीलता आणि संस्कृती यांच्यातील सेतूचे काम करतात, सिनेमा हे राष्ट्रांना एकत्र आणण्याचे सर्वात शक्तिशाली माध्यम आहे." असे या प्रसंगी बोलताना रामकृष्णन यांनी अधोरेखित केले. भविष्यातील सहकार्याबद्दल आणि सिनेमाद्वारे संबंध दृढ करण्याबद्दल आपण उत्साही असल्याचे सांगत हेवावासम यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

महोत्सवाचा प्रोमो आणि टीझरचे अनावरण करण्यात आले, यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त पारंपारिक नर्तक करुणादासा ओलाबोदुआ यांच्या नेतृत्वाखाली के ओ नृत्य अकादमीने आकर्षक श्रीलंकन सांस्कृतिक अदाकारी सादर केली. श्रीलंकेच्या कार्यवाहक वाणिज्य दूतावासाच्या सौजन्याने श्रीलंकेच्या स्वादिष्ट पाककृतीचा आस्वाद घेत संध्याकाळची सांगता झाली. हा महोत्सव 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान एन एम आय सी ऑडिटोरियम 2, एन एफ डी सी प्रांगण, मुंबई येथे सुरू राहील, ज्यामध्ये श्रीलंका आणि भारतातील प्रसिद्ध चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

***
S.Kane/S.Naik/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2098935)
Visitor Counter : 35