दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
बल्क पुश एसएमएस ए2पी या मंचाचा प्रारंभ करत बीएसएनएलने डिजीटल परिवर्तनाच्या वाटचालीत गाठला मैलाचा दगड, देशभरातील आपल्या अतिमहत्वाच्या ग्राहकांच्या सेवेसाठी (Enterprise Customers) फायबराझेशन प्रक्रियेचे 99% कामही केले पूर्ण
Posted On:
31 JAN 2025 7:50PM by PIB Mumbai
मुंबई, 31 जानेवारी 2025
भारत संचार निगम लिमिटेल अर्थात बीएसएनलच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बीएसएनलच्या बल्क पुश एसएमएस ए2पी Bulk Push SMS A2P (Application to Person) या मंचाचे उद्घाटन झाले. यासोबतच संपूर्ण भारतातील एंटरप्राईझ बिझनेस (EB - Enterprise Business) प्लॅटिनम या वर्गवारीतील आपल्या ग्राहकांच्या सेवेसाठी फायबरायझेशनचे 99% टक्के काम करण्याचा उल्लेखनीय टप्पाही बीएसएनएलने गाठला. हे यश साजरे करण्याच्या उद्देशानेच या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जे. रवी हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जे. रवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बीएसएनएलने 99% पेक्षा जास्त फायबर कनेक्टिव्हिटीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या कामगिरीमुळे बीएसएनएलच्या भारतभरातील 61,000 हून अधिक शाखा परस्परांसोबत जोडल्या गेल्या असल्याचे त्यांनी सांगितले. बीएसएनएलने गाठलेला हा टप्पा म्हणजे भारताचे डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने पडलेले एक मोठे पाऊल असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दूरसंचार सेवाविषयक कार्यक्षम जोडणी सेवा प्रदान करण्यासाठी बीएसएनएल वचनबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
डिजिटल माध्यमातून होणारा संवाद सुरक्षित करणे ही काळाची गरज आहे. यादृष्टीनेच बीएसएनएलने बल्क पुश एसएमएस ए2पी (अॅप्लिकेशन टू पर्सन) हा स्वतःच्या व्यवस्थापना अंतर्गतचा मंच विकसित केला आहे. हा मंच डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी माहिती त्यांनी दिली.
यावेळी ए. रॉबर्ट जे. रवी यांनी बीएसएनएलच्या भविष्यातील मोहिमांविषयीदेखील माहिती दिली. आपल्या ग्राहकांना सुरक्षा, परवडणारी दरातील सेवा आणि विश्वासार्हता या तत्वांवर आधारीत नव्या युगातली दूरसंचार विषयक जोडणी आणि उपाययोजनांविषयक सेवा प्रदान करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), बँक ऑफ इंडिया (BOI), सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBoI), बँक ऑफ बडोदा (BOB), युनियन बँक ऑफ इंडिया (UBI), इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (IDBI), इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ICICI), भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC), राष्ट्रीय विमा अकादमी (NIA), अॅक्सिस बँक, वित्तीय सेवा विकास आणि प्रशिक्षण संस्था (IFTAS), एसबीआय पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (SBI PSPL), एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (CDAC) यांसारख्या आघाडीच्या संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, तसेच बीएसएनएल, दूरसंचार विभाग (DoT - Department of Telecommunications) आणि एमटीएनएल अर्थात महानगर टेलिफोन निगम (MTNL -Mahanagar Telephone Nigam Limited) चे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान, बीएसएनएलच्या सात नव्या सेवाही जाहीर केल्या गेल्या. या सेवा खाली दिल्या आहेत:
- स्पॅम-मुक्त नेटवर्क
- बीएसएनएल वायफाय रोमिंग
- बीएसएनएल आयएफटीव्ही (IFTV)
- एनीटाईम सिम (ATM - Anytime Sim) किऑक्स
- संरक्षण, सार्वजनिक संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी थेट संवाद सेवा
- खाण उद्योगांसाठी खासगी 5G तंत्रज्ञानाधारीत सेवा (या क्षेत्रातील अशा प्रकारची पहिलीच सेवा)
- महाकुंभसाठी 5G तंत्रज्ञानाची अंमलबजावणी
बीएसएनएलने घोषित केलेल्या या नव्या सेवा, तसेच आजपर्यंत स्वतःची साधलेली प्रगती यातून, बीएसएनएलची तंत्रज्ञानाशी संबंधित नवोन्मेषाप्रति वचनबद्धतेची दिसून येते. आपल्या 61,000 हून अधिक शाखांच्या फायबरायझेशनची पूर्ण करण्याची बीएसएनएलची ही कामगिरी म्हणजे भारताला डिजिटलदृष्ट्या अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक बनवण्यासाठी बीएसएनएलच्या दृढ निश्चयाचाच एक भाग आहे.
* * *
PIB Mumbai | G.Chipalkatti/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2098204)
Visitor Counter : 25