मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय सांख्यिकी सुधारण्याच्या दृष्टीने तांत्रिक समितीची पुणे येथे बैठक
माहितीतील त्रूटी दूर करण्यासाठी उपाय, सर्वेक्षणासाठी सांख्यिकीय पद्धती आणि विविध राज्यांमधील सर्वोत्तम पद्धती यावर बैठकीत झाली चर्चा
Posted On:
31 JAN 2025 2:43PM by PIB Mumbai
मुंबई, 31 जानेवारी 2025
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय सांख्यिकी सुधारण्यासाठी दिशादर्शक तांत्रिक समितीची (TCD) बैठक पुणे येथे दिनांक 29-30 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे उदघाटन महासंचालक (सांख्यिकी) कल सिंग यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पशुसंवर्धन विभाग आणि दुग्धव्यवसाय विभागाचे सल्लागार जगत हजारिका, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि विविध राज्यांचे आणि संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
माहितीतील आवश्यक त्रूटी ओळखणे, सुयोग्य उपाययोजनांची शिफारस करणे, केंद्र,राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अंमलबजावणी करण्यासाठी सांख्यिकीय पद्धतींवर विचारपूर्वक कृती करणे आणि पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसायाशी संबंधित नमुना सर्वेक्षण आयोजित करण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करणे, ही या समितीची प्राथमिक उद्दिष्टे होती. या बैठकीत समितीने सांख्यिकीय डेटा संकलनाच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि आवश्यक सुधारणांसाठी सूचना प्रस्ताव मांडले.
बैठकीदरम्यान झालेल्या प्रमुख चर्चांमध्ये मागील TCD बैठकीतील कृती अहवाल, एकात्मिक नमुना सर्वेक्षण (ISS) यांचे अवलोकन आणि विविध राज्यांमधून मिळालेल्या माहितीनुसार संकलनातील सर्वोत्तम पद्धतींवरील सादरीकरणांचा समावेश आहे. उत्तराखंड, गुजरात आणि केरळ राज्यांनी ISS साठी माहिती संकलनातील त्यांचे अनुभव सामायिक केले, तर आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि तामिळनाडू या राज्यांनी 21 व्या पशुधन गणनेशी संबंधित सर्वोत्तम पद्धती यावेळी सादर केल्या.

याव्यतिरिक्त 21व्या पशुधन गणनेची प्रगती, आर्थिक विकास आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांसमोरील कर्मचाऱ्यांची येणारी आव्हाने, यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत पशुधन डेटा व्यवस्थापनातील डिजिटल प्रगतीबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करणारी, आयएएसआरआय तज्ञांद्वारे इ-लिस(eLISS) आणि एल. सी.(L.C) सॉफ्टवेअर आधारीत तांत्रिक सादरीकरणे आयोजित करण्यात आली.
यादरम्यान अन्न आणि कृषी संघटनेचे (FAO) भारतातील प्रतिनिधी रोममधील TCD बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदविला आणि त्यांनी भारताचा अन्न ताळेबंद तयार करण्यासाठी पशुसंवर्धन क्षेत्राच्या महत्वाच्या डेटा आवश्यकतांवर तपशीलवार सादरीकरण केले. या बैठकीमुळे जागतिक कृषी आकडेवारी आणि धोरणनिर्मितीसाठी डेटाचे महत्त्व अधोरेखित केले. ज्यामुळे TCD समिती या प्रकरणांत पुढील तपासणी करण्याचा निर्णय घेऊ शकेल.
बैठकीला उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र शासनाचे, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाचे आयुक्त,डॉ. प्रवीण कुमार, महाराष्ट्र शासनाचे,पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतल कुमार मुकणे, आयसीएआर-आयएएसआरआय-पीयुसीए (ICAR-IASRI, PUSA) दिल्लीतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. तौकीर अहमद, आणि पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग संचालक डॉ.व्ही.पी. सिंग हे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
भारतातील पशुधन आकडेवारी सुधारण्यासाठी भविष्यात करण्यात येणा-या मुख्य बाबी आणि भविष्यातील दिशानिर्देशांविषयी सूचना प्रस्ताव मांडून खुल्या चर्चेने या बैठकीचा समारोप झाला. टीसीडी- अध्यक्षांनी धोरणात्मक निर्णयांना समर्थन देण्यासाठी सांख्यिकीय डेटा कृती आराखडा मजबूत करण्यासाठी सहकार्य करत प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, हा पशुधन उत्पादन, संरक्षण,त्यांचे रोगांपासून संरक्षण आणि दुग्धव्यवसाय विकास यावर देखरेख करते. हा विभाग धोरण तयार करताना राज्य सरकार/केंद्रशासित प्रदेशांना सल्लाही देत असतो. पशु उत्पादकता वाढवण्यासाठी, पशुधनाचे आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी आणि केंद्रीय पशुधन मजबूत करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी हा विभाग वचनबद्ध असल्याचे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
पशुसंवर्धन विभाग आणि दुग्धव्यवसाय विभागाद्वारे आभार व्यक्त करण्यात आले.
* * *
PIB Mumbai | H.Raut/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2097948)
Visitor Counter : 27