संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आर्मेडीकॉन 2025: पुण्यातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये यशस्वीरित्या संपन्न

Posted On: 31 JAN 2025 2:35PM by PIB Mumbai

पुणे, 31 जानेवारी 2025

 

पुण्यातील प्रतिष्ठित आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज (एएफएमसी) येथे 73वी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉन्फरन्स (परिषद), आर्मेडीकॉन 2025 यशस्वीरित्या संपन्न झाली. 28 ते 30 जानेवारी 2025 दरम्यान आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमात लष्कर, नौदल आणि हवाई दलातील आरोग्यसेवा व्यावसायिकांसह प्रतिष्ठित नागरी तज्ञ सहभागी झाले. ही परिषद अत्याधुनिक आरोग्यसेवा संशोधनावर चर्चा करण्यासाठी, उदयोन्मुख ट्रेंड्सचा शोध घेण्यासाठी आणि सशस्त्र दल वैद्यकीय सेवा (एएफएमएस) साठी महत्त्वाच्या धोरणात्मक आवश्यकतांवर चर्चा करण्यासाठी एक गतिमान व्यासपीठ म्हणून महत्वाची ठरली.

   

कार्यक्रमाचे उद्घाटन 28 जानेवारी रोजी सर्जन व्हाइस अॅडमिरल आरती सरीन,  एव्हीएसएम, व्हीएसएम, डायरेक्टर जनरल आर्म्ड फोर्सेस मेडिकल सर्व्हिसेस (डीजीएएफएमएस) यांनी केले. उद्घाटनाचे मुख्य भाषण लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएसएम (निवृत्त), एमयूएचएस, नाशिकच्या कुलगुरू आणि एएफएमसी पुणेच्या प्रतिष्ठित माजी विद्यार्थी यांनी केले. आरोग्यसेवेतील  नेतृत्व आणि नवोपक्रम संबंधी मार्गदर्शनाने परिषदेचा सूर व्यक्त झाला.

या परिषदेत विविध वैद्यकीय शाखांमध्ये संस्थात्मक आणि सहयोगी प्रकल्पांद्वारे केलेल्या अभूतपूर्व संशोधनावर प्रकाश टाकण्यात आला. नवोपक्रम राबवणाऱ्या संशोधकांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. यावेळी चीफ ऑफ आर्मी स्टाफ पुरस्कार, चीफ ऑफ नेव्हल स्टाफ पुरस्कार आणि चीफ ऑफ एअर स्टाफ पुरस्कार यासारखे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आले.

   

या वर्षीच्या एमजेएएफआय भाषणात आयआयटी मुंबईचे प्राध्यापक रोहित श्रीवास्तव, विज्ञान श्री आणि हिमांशू पटेल चेअर प्रोफेसर यांनी "भारतासाठी परवडणारी आरोग्यसेवा तंत्रज्ञान" या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी DGAFMS ने AFMS च्या वरिष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत DHR-ICMR अॅडव्हान्स्ड मॉलिक्युलर ऑन्कोलॉजी डायग्नोस्टिक सर्व्हिसेस (DIAMonDS) सेंटर या अत्याधुनिक मॉलिक्युलर ऑन्कोपॅथॉलॉजी प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले.

आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी परिषदेदरम्यान एएफएमएस आणि विविध आयसीएमआर एजन्सींमधील सहकार्याच्या शक्यता यावर ऑनलाइन मार्गदर्शन केले.

   

प्रख्यात नागरी तज्ज्ञांनी विचारप्रवर्तक अतिथी व्याख्यानांसह संवाद साधला. यात पुढील ठळक मुद्द्यांचा समावेश होता :

  • डॉ. आशुतोष नाथ अग्रवाल, पीजीआयएमईआर चंदीगड यांनी "पुरावे-आधारित औषध-भविष्याचा मार्ग" या विषयावर मार्गदर्शन केले
  • डॉ. राजीव सरीन, ACTREC, टाटा मेमोरियल सेंटर, मुंबई यांनी "दक्षिण आशियाई लोकांमध्ये कर्करोगाच्या अनुवंशशास्त्राचा उलगडा करून उपचार करणे आणि प्रतिबंध करणे" या विषयावर मार्गदर्शन केले

डीजीएएफएमएसच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सशस्त्र दल वैद्यकीय शैक्षणिक समिती (एएफएमएसी) च्या बैठकीत प्रशिक्षण पायाभूत सुविधांमध्ये प्रगती करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्यसेवेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्धतेवर भर देण्यात आला.

   

"रिसर्च इन एएफएमएस-वे फॉरवर्ड" या विशेष सत्रात एएफएमएसच्या वैद्यकीय संशोधन विभाग, आर्म्ड फोर्सेस सेंटर फॉर कॉम्प्युटेशनल मेडिसिन (एएफसीसीएम), हेल्थ टेक्नॉलॉजी असेसमेंट रिसोर्स सेंटर आणि मॉलिक्युलर बायोलॉजी लॅब यांच्या नेतृत्वाखालील एएफएमएसच्या नवोपक्रमांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.

योद्धा रक्षक बचाव किट चॅलेंज सारख्या परस्परसंवादी उपक्रमांनी तळागाळातील नवोपक्रमांना चालना दिली, तर वैद्यकीय लॉजिस्टिक्स ड्रोन आणि नौदल रुग्णालय आरोग्य माहिती व्यवस्थापन प्रणालीच्या प्रात्यक्षिकांनी तांत्रिक प्रगतीचे दर्शन घडवले.

पदवीपूर्व संशोधनावरील विशेष सत्रात पदवीपूर्व प्रशिक्षण आणि समुदाय सहभागाचे प्रदर्शन करण्यात आले.

   

आर्मेडीकॉन 2025 हे एएफएमएसमधील शैक्षणिक, प्रशासन आणि संशोधनाच्या समन्वयाचे प्रतीक म्हणून प्रस्थपित झाले, ज्याने सशस्त्र दलांसाठी आणि देशासाठी भविष्यातील आरोग्यसेवा आव्हानांना तोंड देण्यासाठी एक मजबूत पाया रचला.

 

* * *

PIB Pune | H.Akude/H.Kenekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2097941) Visitor Counter : 34


Read this release in: English