शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थेची (NIOS) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाअंतर्गतची ऑन डिमांड एक्झामिनेशन 3 फेब्रुवारी ते 27 मार्च 2025 या कालावधीत होणार
Posted On:
29 JAN 2025 2:40PM by PIB Mumbai
मुंबई, 28 जानेवारी 2025
राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थेच्या (The National Institute of Open Schooling - NIOS) माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाअंतर्गतच्या ऑन डिमांड एक्झामिनेशन' (ODE) 03 फेब्रुवारी 2025 ते 27 मार्च 2025 या कालावधीत होणार असल्याचे सूचित केले जात आहे. यासाठी निश्चित केलेल्या केंद्रीय विद्यालयांमध्ये या परीक्षा घेतल्या जातील. राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थेच्या www.nios.ac.in आणि http://sdmis.nios.ac.in या संकेतस्थळांवर परीक्षांसाठीचे नोंदणी अर्ज आणि शुल्कासह www://sdmis.nios.ac.in वर उपलब्ध असेल. स्ट्रीम - 3 आणि 4 साठी [Stream-3 – मुक्त विद्यालयी शिक्षण संस्थेच्या (NIOS) माध्यमातून बाह्य विद्यार्थ्यांसाठी (external candidates) 10 वीच्या परीक्षेची संधी. / Stream - 4 – मुक्त विद्यालयी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बाह्य विद्यार्थ्यांसाठी 12 वीच्या परीक्षेची संधी.] नोंदणी करण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे. ओडीईच्या प्रश्नपत्रिका नवीन अभ्यासक्रमाच्या आधारेच दिल्या जाणार आहेत.
विद्यार्थी / परीक्षकांनी त्यांची लेखी स्वरुपातील सैद्धांतिक परीक्षा ज्या केंद्रावर होणार आहे, त्या केंद्राशी परीक्षेच्या दिवशी संपर्क साधून आपल्या प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा आणि वेळेबाबतची माहिती मिळवावी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी स्वतंत्र प्रवेश पत्रिका (हॉल तिकीट) दिले जाणार नाही.
अधिक माहिती आणि परीक्षेच्या वेळापत्रकासंबंधी माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या संकेतस्थळांना भेट द्यावी किंवा राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थेच्या (The National Institute of Open Schooling - NIOS) पुणे इथल्या प्रादेशिक केंद्राशी संपर्क साधावा.
* * *
PIB Mumbai | S.Tupe/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2097299)
Visitor Counter : 36