नौवहन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वाढवण बंदर प्रकल्पासाठी टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड सार्लबरोबर सामंजस्य करारावर ‘जेएनपीए’ची स्वाक्षरी

Posted On: 23 DEC 2024 10:22PM by PIB Mumbai

मुंबई, 23 डिसेंबर 2024

 
जेएनपीए म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाच्‍यावतीने वाढवण बंदर प्रकल्प (व्हीपीपीएल) बांधकाम करण्‍यासंबंधी  सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.यामुळे आज टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ‘सार्ल’ (टीआयएल ) बरोबर  एक महत्त्वपूर्ण सहकार्य  स्थापित झाले  आहे. या  भागीदारीमुळे  भारतातील बंदर क्षेत्रातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी आणि वाढवण बंदराला भविष्यातील जागतिक दर्जाचे बंदर बनवण्यासाठी जेएनपीएचे समर्पण दिसून येते. याप्रसंगी जेएनपीएचे अध्‍यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी संचालक आणि  व्हीपीपीएलचे अध्‍यक्ष,  मुख्‍य कार्यकारी संचालक  उन्मेष शरद वाघ, आणि कॅप्टन दीपक तिवारी, धनंजय जावडेकर आणि करण तिवारी यांच्या उपस्थितीत सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली.

या सामंजस्य करारानुसार, टीआयएलने वाढवण बंदर आणि परिसरामध्‍ये बंदर परिसंस्थेच्या विकासासाठी अंदाजे 20,000 कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. टीआयएल  या  कंपनीने स्वित्झर्लंड बाहेरच्या  कंटेनर टर्मिनल्सचे वैविध्यपूर्ण काम केले  आहे.   

याप्रसंगी बोलताना जेएनपीएचे अध्यक्ष आणि व्‍हीपीपीएल चे मुख्‍य कार्यकारी संचालक  उन्मेष शरद वाघ म्हणाले, “टर्मिनल इन्व्हेस्टमेंट लिमिटेड सार्ल सोबतचा सामंजस्य करार हा भारतातील बंदराच्या पायाभूत सुविधांना  पुनर्परिभाषित करणारा आहे.  वाढवण बंदरासाठी  हा करार करणे, म्हणजे आमच्या दृष्टीने  एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही भागीदारी केवळ भारताच्या सागरी क्षेत्रातील जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवत नाही तर अत्याधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत पद्धती आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे एकत्रीकरण सुनिश्चित करते. एकत्रितपणे, आम्ही एक बंदर परिसंस्था  तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.  तसेच  कार्यक्षमता आणि नाविन्यपूर्णता यामध्ये नवीन ‘बेंचमार्क’ तयार करण्‍याचे काम  केले जाणार आहे.”

N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2087470)
Read this release in: English